Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Maharashtra Corona : महाराष्ट्रात 43 नवीन रुग्ण आढळले! 200 वर रुग्ण, मे महिन्यात सर्वात जास्त रुग्ण

Maharashtra Corona Update 43 new patients found in the state : महाराष्ट्रात आणि कर्नाटकात कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत असून राज्यात कोरोनाचे ४३ नवीन रुग्ण आढळले आहेत. काल ठाण्यातील एका तरुणाच्या मृत्यूनंतर अद्याप कुणाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही. मात्र एकट्या मे महिन्यातच 242 रुग्ण आढळले असून जानेवारीपासून जवळपास 300 रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पुणे येथे रुग्णसंख्या वाढत असल्याचे आकडेवारी सांगते. मुंबईतील रुग्णसंख्या तर थोडी चिंताजन आहे, अशातच महाराष्ट्रात आढळलेल्या कोरोना बाधित 43 नवीन रुग्णांपैकी 35 मुंबईतील आणि 8 पुण्यातील आहेत.

Maharashtra Corona Update

राज्यात सध्या 209 सक्रिय रुग्ण

राज्यात सध्या 209 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. या वर्षी जानेवारीपासून एकूण 300 रुग्ण प्रकरणे नोंदवली गेली, त्यात गंभीर बाब म्हणजे जवळपास 242 प्रकरणे म्हणजेच 80 टक्के केसेस केवळ मे महिन्यातील आहेत, या वर्षी आतापर्यंत मुंबईत 248 प्रकरणे नोंदली गेली आहेत, जी राज्यातील एकूण प्रकरणांपैकी 82.67 टक्के इतके आहे.

Take a Poll

कोणत्या महिन्यात किती प्रकरणे

  • जानेवारी -1
  • फेब्रुवारी -1
  • मार्च -0
  • एप्रिल -4
  • मे -242 प्रकरणांची नोंद झाली.

किती रुग्ण उपचार, किती बरे अन् मृत्यू?

प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत 87 रुग्ण बरे झाले आहेत, तर 4 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र आणि कर्नाटताकील कोविडच्या प्रकोपाच्या धर्तीवर केंद्र सरकारने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांनी या राज्यात पाहणी केली आहे. लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि कोविड-१९ प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहनही आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर अशी घ्या काळजी

  • मास्कचा वापर नेहमी योग्य पद्धतीने करावा, मास्कने नेहमीच नाक आणि तोंड झाकले गेले पाहिजे.
  • जिथे शक्य असेल तिथे नेहमीच सामाजिक अंतर (6 फूट अंतर) राखावे.
  • हात साबणाने किंवा सॅनिटायझरने वारंवार आणि स्वच्छ धुवावेत
  • साबणाने न धुता किंवा सॅनिटायझर न वापरता हाताने नाक/डोळे/तोंडाला स्पर्श करणे टाळा.
  • योग्य श्वसन स्वच्छता राखा.
  • वारंवार साफ केलेले पृष्ठभाग नियमितपणे स्वच्छ आणि निर्जतुक करा,
  • खोकताना किंवा शिंकताना टिश्यूचा वापर करावा आणि वापरलेले टिश्यू कचरापेटीमध्ये टाकावेत. जर, खोकताना किंवा शिकताना एखा‌द्याकडे टिश्यू पेपर नसल्यास हाताच्या वाकलेल्या कोपराल शिकावे.
  • सार्वजनिक ठिकाणी थंकू नये.
  • आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडणे टाळावे.
  • गर्दी टाळा आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर (6 फूट अंतर) ठेवा.
  • एकमेकांना भेटताना हस्तांदोलन टाळा व सुरक्षीत अंतर राखूनच नमस्कार करा.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+