रात्री 'या' 5 समस्या जाणवतायत? दुर्लक्ष करू नका, किडनी निकामी होण्याचे असू शकतात संकेत!
kidney damage Symptoms at night : असं म्हणतात की शरीर आजारी पडण्यापूर्वी आपल्याला काही धोक्याच्या सूचना देत असतं, पण आपण त्याकडे 'साधं दुखणं' म्हणून दुर्लक्ष करतो. किडनीच्या बाबतीत तर हे अधिक लागू होतं. किडनी कधीच अचानक खराब होत नाही, ती निकामी होण्यापूर्वी शरीरात काही बदल घडून येतात, जे विशेषतः रात्रीच्या वेळी प्रकर्षाने जाणवतात. हे बदल वेळीच ओळखले तर आपण संभाव्य धोका टाळू शकतो.

रात्री जाणवणारी किडनी डैमेजची ५ लक्षणे
१. वारंवार लघवीला होणे
जर तुम्हाला रात्रीच्या वेळी वारंवार लघवीसाठी उठावे लागत असेल, तर हे किडनीच्या आजाराचे प्राथमिक लक्षण असू शकते. जेव्हा किडनी फिल्टर करण्याचे काम व्यवस्थित करू शकत नाही, तेव्हा लघवीची ऊर्मी वाढते.
२. पाय आणि घोट्यांवर सूज
दिवसभराच्या कामानंतर रात्री जर तुमचे पाय किंवा घोटी सुजलेले दिसत असतील, तर सावधान! किडनी निकामी होऊ लागल्यावर शरीरातील सोडियम बाहेर पडण्याचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे शरीरात पाणी साठून राहते आणि सूज येते.
३. झोपेत वारंवार व्यत्यय येणे
जेव्हा किडनी रक्तातील टॉक्सिन्स (विषाक्त पदार्थ) योग्यरित्या बाहेर काढू शकत नाही, तेव्हा हे टॉक्सिन्स रक्तातच राहतात. यामुळे झोप नीट लागत नाही आणि रात्री वारंवार जाग येते.
४. त्वचेला खाज सुटणे आणि कोरडेपणा
रात्रीच्या वेळी अचानक अंगाला खूप खाज सुटणे किंवा त्वचा अत्यंत कोरडी पडणे हे किडनी डैमेजचे लक्षण असू शकते. रक्तातील खनिजे आणि पोषक तत्वांचे संतुलन बिघडल्यामुळे ही समस्या उद्भवते.
५. अतिशय थकवा जाणवणे
रात्री विश्रांतीच्या वेळीही जर तुम्हाला प्रचंड अशक्तपणा किंवा थकवा जाणवत असेल, तर ते किडनीच्या कार्यात अडथळा असल्याचे संकेत आहेत. किडनी निकामी होऊ लागल्यास रक्तातील दूषित घटक वाढतात, ज्याचा परिणाम ऊर्जेवर होतो.
(महत्त्वाची टीप: वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे वारंवार जाणवत असतील, तर स्वतःहून उपचार न करता त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
-
Womens day 2026 wishes quotes : महिला दिनी 'पहिली सुपरवुमन' आईसाठी खास हृदयस्पर्शी शुभेच्छा संदेश -
Box Office Report : 'द केरळ स्टोरी 2' ची जादू कायम; नवीन चित्रपटांची संथ सुरुवात, 'ओ रोमियो'ची घसरण -
आहार 2026: एक अनिवार्य व्यापार प्रदर्शन -
IND vs NZ Final: हेड-टू-हेडमध्ये टीम इंडिया 'किंग', पण वर्ल्ड कपमध्ये किवींचेच पारडे जड; आकडेवारी? -
परवानगीची गरज नाही!; रशियन तेल खरेदीबाबत भारताचे अमेरिकेला चोख प्रत्युत्तर; म्हणाले-राष्ट्रहित प्रथम -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
Bihar next cm : ठरलं! 'हा' नेता होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री! नितीश कुमार दिल्लीला जाणार.. -
India Post GDS Result 2026: ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर; 'असा' तपासा तुमचा निकाल! -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य -
'धुरंधर-2' चा राडा! पहिल्याच दिवशी 'एवढी' कमाई; 'रणवीर'च्या चित्रपटाचे रेकॉर्डब्रेक ॲडव्हान्स बुकींग









Click it and Unblock the Notifications