Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'यॉर्कर किंग' जसप्रीत बुमराहच्या फिटनेसचं रहस्य: आहारात काय आणि कोणत्या ४ गोष्टींपासून राहतो दूर?

Jasprit Bumrah Fitness Plan : भारतीय क्रिकेट संघाची धारदार तलवार आणि जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज, जसप्रीत बुमराह, जेव्हा तो बॉल घेऊन धावपट्टीवर येतो, तेव्हा त्याची ऊर्जा आणि अविश्वसनीय चपळाई प्रतिस्पर्धी फलंदाजांनाही अचंबित करते. तो भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज आहेच पण 'यॉर्कर किंग' म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे.

जसप्रीत बुमराह हा केवळ त्याच्या भेदक गोलंदाजीमुळेच नव्हे, तर अविश्वसनीय फिटनेसमुळेही चर्चेत असतो. मैदानावरील त्याची चपळाई आणि ऊर्जा पाहून अनेक चाहत्यांना त्याच्या फिटनेसचे रहस्य काय आहे, हा प्रश्न पडतो. त्याचा कठोर डाएट आणि वर्कआउट प्लॅन काय आहे हे जाणून घेऊया.

Jasprit Bumrah Fitness Plan

बुमराहचा फिटनेस दिनक्रम (वर्कआउट प्लॅन)

  • जसप्रीत बुमराह फिटनेसबाबत अत्यंत शिस्तबद्ध आहे. त्याच्या फिटनेस रूटीनची सुरुवात दररोज रनिंगने होते. बुमराह रोज अनेक किलोमीटर धावतो, ज्यामुळे त्याचा स्टॅमिना, बॉडी स्ट्रेंथ आणि स्नायूंची लवचिकता टिकून राहते. एक वेगवान गोलंदाज असल्याने रनिंग हा त्याच्या फिटनेस रूटीनचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
  • जिममध्ये हेवी वर्कआउट सुरू करण्यापूर्वी तो वॉर्मअप कधीही चुकवत नाही. यासाठी तो स्किपिंग, स्प्रिंटिंग आणि हलके मोमेंट्स करतो, जेणेकरून सरावादरम्यान दुखापतीचा धोका कमी होतो.
  • जसप्रित बुमराह जीममध्ये कठोर ट्रेनिंग करतो आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगवर त्याचे विशेष लक्ष असते. बेंच प्रेस, स्कॉट्स, ओव्हरहेड प्रेस आणि डेडलिफ्ट्स यांसारखे व्यायाम तो नियमितपणे करतो. याशिवाय, तो डेडलिफ्ट्स, क्रंचेस आणि प्लँकचाही सराव करतो.
  • स्नायूंची रिकव्हरी आणि लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी बुमराहला पोहायलाही आवडते.

बुमराहचा डाएट प्लॅन: हाय प्रोटीनवर भर

फिटनेससोबतच बुमराह आपल्या आहारावर पूर्ण लक्ष देतो. त्याचा दिवस एक ग्लास पाणी पिऊन सुरू होतो आणि तो 'हाय प्रोटीन डाएट' घेतो, ज्यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते.

सकाळचा नाश्ता: नाश्त्यात तो बेक्ड बीन्स, चिकन सॉसेजेस आणि ऑम्लेट यांचा समावेश करतो.

दुपारी/रात्रीचे जेवण: दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात तो पनीर, मासे आणि हिरव्या भाज्या यांसारख्या प्रोटीनयुक्त गोष्टी खातो.

कार्बोहायड्रेट्स: शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी आवश्यक कार्बोहायड्रेट्सची पूर्तता करण्यासाठी तो ब्राऊन राइस आणि रताळी (शकरकंद) खातो.

'या' ४ गोष्टींपासून बुमराह राहतो दूर

जसप्रीत बुमराह जगातील यशस्वी वेगवान गोलंदाजांमध्ये गणला जाण्याचे एक मोठे कारण म्हणजे त्याची कठोर जीवनशैली. उत्तम फिटनेस राखण्यासाठी तो गोड पदार्थ, तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड फूड आणि दारू या गोष्टींपासून दुर राहतो.

हेही वाचा : रोहीत-यशस्वी जायसवालचा डबल धमाका! एकाच सामन्यात 4 रेकाॅर्ड, मोडले जुने विक्रम, भारताने रचला इतिहास

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+