Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रोहीत-यशस्वी जायसवालचा डबल धमाका! एकाच सामन्यात 4 रेकाॅर्ड, मोडले जुने विक्रम, भारताने रचला इतिहास

Rohit-Jaiswal Duo Smashes Records : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने केवळ मालिकाच जिंकली नाही, तर विक्रमांचा एक नवा अध्याय लिहिला. कर्णधार रोहित शर्मा आणि युवा तडाखेबाज यशस्वी जायसवाल यांच्या बॅटने मैदान दणाणून सोडले, तर फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने आपल्या जादुई स्पेलने पाहुण्या संघाला निष्प्रभ केले. या विजयामुळे भारतीय क्रिकेटच्या 'रेकॉर्ड बुक'मध्ये अनेक स्वर्णिम नोंदी झाल्या असून, हा सामना अनेक वर्षांसाठी क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात राहील.

Rohit-Jaiswal Duo Smashes Records

रेकॉर्ड ब्रेकर्स: या सामन्यातील ५ महत्त्वाच्या नोंदी

या निर्णायक लढतीत भारतीय खेळाडूंनी ४ मोठे विक्रम प्रस्थापित केले आहेत. या विक्रमाने क्रिकेट जगताला थक्क केले असून ते विक्रम जाणून घेऊया.

१. सलामीचा 'विस्फोट': सचिन-गांगुलीचा विक्रम थोडक्यात हुकला!

यशस्वी जायसवाल आणि रोहित शर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे इतिहासातील दुसरी सर्वात मोठी सलामी भागीदारी केली. यापूर्वी, फक्त सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी २००१ मध्ये १९३ धावांची मोठी भागीदारी केली होती. हा विक्रम मोडण्यात ही जोडी थोडक्यात कमी पडली असली तरी, रोहित शर्माने आपल्या वनडे कारकिर्दीत ३५वी शतकी सलामी भागीदारी पूर्ण केली आहे. या यादीत तो फक्त सचिन तेंडुलकर (४०) यांच्या मागे आहे.

२. जायसवाल: 'ट्रिपल-प्ले' करणारा सहावा भारतीय फलंदाज!

या सामन्यात पहिले वनडे शतक झळकावणाऱ्या यशस्वी जायसवालने एक खास क्लबमध्ये प्रवेश केला आहे. तो आता क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट (टेस्ट, वनडे, टी२०) मध्ये शतक करणारा सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हे यश सुरेश रैना, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी मिळवले आहे.

३. रोहित शर्मा: २०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा 'माईलस्टोन'!

कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व फॉरमॅट मिळून २०,००० धावा पूर्ण केल्या. हा ऐतिहासिक पराक्रम करणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. या 'एलिट क्लब'मध्ये त्याच्यासोबत सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांचा समावेश आहे.

४. कुलदीपचा दक्षिण आफ्रिकेवर 'पंच': दोन दशकांचा विक्रम मोडला!

फिरकीपटू कुलदीप यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पाचव्यांदा ४-विकेट हॉल घेण्याचा पराक्रम केला. हा विक्रम कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक ४-विकेट हॉल घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत आता अव्वल आहे. यापूर्वी, भारताचा माजी धडाकेबाज गोलंदाज झहीर खान (झिम्बाब्वेविरुद्ध ४ वेळा) आणि मोहम्मद शमी (वेस्ट इंडिजविरुद्ध ४ वेळा) यांचा विक्रम कुलदीपने मोडला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+