पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ आजाराचे आता 67 रुग्ण! जाणून घ्या किती धोकादायक आहे हा आजार
GBS : महाराष्ट्रातील पुणे येथे दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार 'गुइलेन बॅरे सिंड्रोम' (जीबीएस) ची एकूण 67 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यात 13 रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत, या आजाराची व्याप्ती वाढतचअसल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तीन वेगवेगळ्या मोठ्या हॉस्पिटलसह इतर रुग्णालयात रुग्ण दाखल झाले आहेत. ही प्रकरणे उघडकीस आल्यानंतर पुणे महानगरपालिका आणि आरोग्य विभागाला गुइलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस)बाबत सतर्क करण्यात आले आहे.
खासकरुन आरोग्य विभागाने खबरदारी बाळगत बाधित क्षेत्र सील केले असून तेथे आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

काय आहे हा आजार?
GBS मध्ये, शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा चुकून मज्जासंस्थेवर हल्ला करते, ज्यामुळे स्नायू कमकुवत होणे, सुन्न होणे आणि कधीकधी अर्धांगवायू यांसारखी लक्षणे दिसतात. चला जाणून घेऊया हा आजार किती धोकादायक आहे?
पुण्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोम गुइलेन बॅरी सिंड्रोम म्हणजे काय?
गुइलेन बॅरी सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ आणि गंभीर स्वयंप्रतिकार विकार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा चुकून परिधीय नसावर हल्ला करते. या हल्ल्यामुळे सूज येते आणि मज्जातंतूंना नुकसान होते, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात, मुंग्या येणे, सुन्न होणे आणि कधीकधी गंभीर प्रकरणांमध्ये श्वास घेण्यास त्रास होतो.
या आजाराचे नेमके कारण काय?
- या आजाराचे नेमके कारण अद्याप ज्ञात नाही, परंतु सामान्यतः हा विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गासारख्या संसर्गानंतर विकसित होतो.
- फ्लू, डेंग्यू किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शननंतर अनेक प्रकरणांमध्ये GBS आढळून आले आहे. यानंतर रुग्णांनी लगेच डाॅक्टरांचा सल्ला घेणे अपेक्षित आहे. कारण योग्य उपचाराने रुग्णाची स्थिती सुधारते.
गुइलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) ची लक्षणे
- गुइलेन बॅरी सिंड्रोम (GBS) च्या प्रमुख लक्षणांमध्ये स्नायूंमध्ये अचानक कमजोरी
- विशेषत: पाय आणि हातांमध्ये मुंग्या येणे किंवा सुन्न होणे यांचा समावेश होतो.
- रुग्णाला संतुलन राखण्यात आणि चालण्यात अडचण येऊ शकते.
- गंभीर प्रकरणांमध्ये, श्वास घेण्यात अडचण, जलद हृदयाचे ठोके आणि रक्तदाबात बदल देखील दिसून येतात.
- ही लक्षणे वेगाने वाढू शकतात, ज्यामुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते. वेळेवर उपचार करून लक्षणे नियंत्रित करता येतात.
- Guillain Barrie सिंड्रोम (GBS) वर त्वरित आणि काळजीपूर्वक उपचार आणि व्यवस्थापित केले पाहिजे.
गुइलेन बॅरी सिंड्रोमचा उपचार
1. इम्युनोग्लोबुलिन थेरपी (IVIG) : ही थेरपी रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रित करण्यास मदत करते.
2. प्लाझ्मा फेरेसिस : यामध्ये रक्तातील हानिकारक अँटीबॉडी काढून मज्जासंस्थेला होणारे नुकसान टाळले जाते.
3. स्वच्छतेकडे लक्ष द्या : संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.
4. खबरदारी : तुम्हाला स्नायू कमकुवत होणे, मुंग्या येणे किंवा इतर लक्षणे जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
5. संसर्गानंतर खबरदारी : कोणत्याही संसर्गानंतर शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका.
वेळेवर उपचार करून स्थिती सुधारणे शक्य आहे.












Click it and Unblock the Notifications