Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ट्रान्सजेंडर महिलांनाही पीरीयड्स येतो का? क्रिकेटर अनया बांगरने केला खुलासा! जाणून घ्या काय म्हणाली?

Do transgender women gets periods : महिलांच्या जीवनात मासिक पाळी येणे हे नैसर्गिकच आहे, पण समाजात याबाबत समज-गैरसमज जास्त आहेत. मुळातः ती अडचण नसून महिलांसाठी ते वरदान आहे, या पाळीमुळे शरीरातील संप्रेरकांचे सुयोग्य संतूलन राखले जाते.

भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर याची मुलगी अनया बांगर ही नेहमी चर्चेत असते. अनया आधी मुलगा होती, तिने लिंगबदल करुन घेतल्यानंतर तिची देशभरात चर्चा झाली. तिने आपल्या या प्रवासाबद्दल अनेकदा भाष्य केले आहे. यावेळी तिने लिंगबदल केल्यानंतर आणि ट्रान्सजेंडर्संना पीरियड्स (मासिक पाळी) येते का याबाबत खुलासा केला आहे.

Do transgender women gets periods

अनयाने अलिकडेच केले लिंगपरिवर्तन

अनया बांगर हिने अलिकडेच लिंगपरिवर्तन केले. यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली, एकतर क्रिकेटपटूची मुलगी आणि दुसरीकडे तिच्या जीवनात झालेला मोठा बदल यामुळे तिचे आयुष्यही बदलून गेले आहे. ती पुरुषाची स्त्री झाली आहे. अनेकांच्या मनात ही गोष्ट असते की, मग अशा पद्धतीने पुरुषाचे स्त्री झालेल्यांना आणि ट्रान्सजेंडर्संना मासिक पाळी येते का, यासंदर्भात फारशी माहिती अनेकांना नाही, अनयाने या प्रश्नाबाबत उघड भाष्य केले आहे.

काय म्हणतेय अनया बांगर?

अनयाने म्हटले की, तिला पीरियड्स येत नाही. याचे कारण म्हणजे लिंगपरिवर्तन केले तरी मुळातः नैसर्गिकरित्या जी ओव्हरी अर्थातच अंडाशय आणि गर्भाशय नसते.

मासिक पाळी येते की नाही?

अनया बांगर हिने हेही म्हटले की, ट्रान्सजेंडर महिलांच्या शरीराची संरचना आणि जैविक प्रक्रिया, जन्माने महिलांचे शरीर असलेल्या व्यक्तींपेक्षा भिन्न असते. त्यामुळे नैसर्गिकरित्या त्यांना मासिक पाळी येत नाही. ट्रान्सजेंडर असणे म्हणजे पुर्णपणे स्त्रीलिंगी शारीरिक प्रक्रियांशी संबंधित आहे, परंतु सत्य यापेक्षा वेगळे आहे असे ती म्हणते.

मासिक पाळी नसली तरीही हा अनुभव येतोय..!

अनया बांगर हिने म्हटले की, मला मासिक पाळी येत नाही परंतु, महिलांचा ज्यापद्धतीने मासिक पाळीत मुड स्विंग (अचानक स्वभाव बदलणे) होतो तसेच ट्रान्सजेंडर महिलांनाही अनुभव येतो. याबद्दलच्या प्रश्नांवरील समज-गैरसमजांबद्दल जाहीरपणे चर्चा व्हायला हव्या असे ती म्हणते, त्याचे कारणही ती सांगते. समाजात संवेदनशिलता आणि जागृती व्हावी असे तिचे म्हणणे आहे. तिने लोकांना हेही सांगितले की, तृतीयपंथीयांबद्दल गैरसमज पसरवू नये त्यांच्याबद्दल सन्मानजनक भाषेचा वापर करायला हवा.

Disclaimer : या लेखात दिलेली माहिती केवळ सामान्य माहिती आणि शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. ती कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय सल्ल्याचा, तपासणीचा किंवा उपचारांचा पर्याय नाही. आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी किंवा प्रश्नांसाठी नेहमीच तुमच्या डॉक्टरांचा किंवा पात्र आणि अनुभवी आरोग्य प्रदात्याचा सल्ला घ्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+