Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Corona virus update कोरोनाची नवी लाट? महाराष्ट्र रेड झोनमध्ये! सक्रिय रुग्णसंख्या 4000, मृत्यू किती?

Corona virus update Maharashtra Kerala : महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून पर्यायाने मृतांचाही आकडा वाढत आहे. देशात कोरोनाचा उद्रेक अद्याप तरी झाला नसला आणि परिस्थिती तूर्त नियंत्रणात असली तरीही कोविड-19 ची लाट पुन्हा एकदा भारतात परतणार आहे का? हा प्रश्न आता अधिक गंभीर होत चालला आहे कारण देशात एका आठवड्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे.

Corona virus update Maharashtra Kerala

महाराष्ट्रात किती सक्रीय रुग्ण?

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 21 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे केरळनंतर, एकूण सक्रिय रुग्णांच्या संख्येत 506 आकड्यांसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे तर येथे एकूण मृत्यू 8 इतके नोंदवले गेले आहेत.

चार राज्यात काय आहे स्थिती?

आज आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात एप्रिलपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या फार कमी होती, तर जूनच्या सुरुवातीला ही संख्या 4000 च्या जवळ पोहोचली आहे. NB.1.8.1 आणि LF.7 सारख्या नवीन प्रकारांमुळे संसर्गाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे, विशेषतः केरळ, महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटकमध्ये संसर्ग दर आणि मृत्युदर दोन्ही वाढत आहेत.

देशात काय आहे स्थिती?

  • 2 जून 2025 रोजी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत 203 सक्रिय रुग्ण आढळले आहेत.
  • कोरोनामुळे एकूण 4 मृत्यू झाले आहेत. 1 जानेवारी ते 2 जून 2025 पर्यंत, मृतांची संख्या 32 आणि सक्रिय रुग्ण 3961 आहेत.

ताज्या आकडेवारी काय सांगतात?

महाराष्ट्र कोरोना अपडेट : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक वाढता दिसत आहे, रिपोर्टनुसार, गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 21 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सक्रीय रुग्णसंख्या 506 एवढी आहे.

दिल्ली कोरोना अपडेट : आरोग्य मंत्रालयाच्या मते, दिल्लीत गेल्या चोवीस तासात 47 नवीन रुग्ण आढळले आणि 1 मृत्यू झाला. सध्या, दिल्लीत एकूण 483 सक्रिय रुग्ण आहेत, तर एकूण मृत्यू 4 वर पोहोचले आहेत.

कर्नाटक कोरोना अपडेट : गेल्या दिवशी कर्नाटकात 15 नवीन रुग्ण आढळले, तर मृत्यू शु्न्य होते. परंतु तब्बल 253 रुग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत 4 मृत्यू झाले आहेत.

केरळ कोरोना अपडेट : केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. गेल्या 24 तासांत 35 नवीन रुग्ण आढळले, तर एका मृत्यूची नोंद झाली आहे. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1435 झाली आहे, मृत्यूच्या बाबतीत ते 8 आकड्यांसह अव्वल स्थानावर आहे.

4 राज्यात एकूण सक्रीय रुग्ण, मृत्यू किती?

  • केरळमध्ये सक्रिय रुग्ण : 1435, मृत्यू: 8
  • महाराष्ट्रात सक्रिय रुग्ण: 506, मृत्यू: 8
  • दिल्लीत सक्रिय रुग्ण: 483, मृत्यू: 4
  • कर्नाटकात सक्रिय रुग्ण: 253, मृत्यू: 4
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+