Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

CGHS New Rates 2025 :केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट! आरोग्य सुविधेत हा बदल, CGHS मधून डबल फायदा

CGHS New Rates 2025 Double Benefit for Central Govt Employees : केंद्र सरकार आरोग्य सुविधांमध्ये मोठे बदल करत आहे, यासोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांना लाभ होईल, त्यांचा फायदा होईल असे हितकारक निर्णय घेत आहे. डीए वाढवण्याच्या घोषणेनंतर केंद्र सरकारने देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिवाळीपूर्वी एक मोठे गिफ्ट दिले आहे. महागाई भत्ता वाढवल्यानंतर आता सरकारने केंद्रीय सरकार आरोग्य योजनेच्या दरांमध्ये ऐतिहासिक बदल केले आहेत.

CGHS New Rates 2025

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या सुधारित दरांची घोषणा केली असून, हे नवीन दर १३ ऑक्टोबर २०२५ पासून लागू होणार आहेत. २०१४ नंतर सीजीएचएसच्या दरांमध्ये इतके मोठे आणि सर्वसमावेशक बदल पहिल्यांदाच करण्यात आले आहेत.

CGHS योजना काय आहे ?

सीजीएचएस (Central Government Health Scheme) ही योजना केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सबसिडी दरात वैद्यकीय सुविधा पुरवते. यामध्ये ओपीडी, शस्त्रक्रिया, तपासण्या आणि रुग्णालयात दाखल होणे यांसारख्या सेवांचा समावेश असतो.

या बदलांचे होते २ कारणं

पहिले म्हणजे कर्मचाऱ्यांची तक्रार सीजीएचएस संलग्न रुग्णालये अनेकदा कॅशलेस उपचार करण्यास नकार देत होते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांवर प्रथम स्वतःच्या खिशातून खर्च करण्याची आणि नंतर रिफंडसाठी महिनोंमहिने वाट पाहण्याची वेळ येत होती.

दुसरी म्हणजे रुग्णालयांची अडचण जुन्या दरांमुळे खासगी रुग्णालयांना आर्थिक नुकसान होत होते, परिणामी अनेक चांगल्या रुग्णालयांनी CGHS पॅनलमधून स्वतःला वगळले होते.

नवीन दरांमुळे काय बदलणार?

आता उपचारांची किंमत शहर आणि रुग्णालयाच्या श्रेणीनुसार निश्चित केली जाईल, ज्यामुळे दरांमध्ये पारदर्शकता येईल आणि समानता राहील.

रुग्णालयाची श्रेणी: NABH किंवा NABL मान्यताप्राप्त रुग्णालयांना बेस रेट नुसार पैसे दिले जातील, तर मान्यता नसलेल्या रुग्णालयांना १५% कमी दर मिळेल. सुपर स्पेशालिटी रुग्णालयांना बेस रेटपेक्षा १५% अधिक दर मिळणार आहे.

शहरांची श्रेणी: टियर-II शहरांमध्ये पॅकेज रेट बेस रेटपेक्षा १९% कमी, तर टियर-III शहरांमध्ये २०% कमी असेल.

फायदा काय होणार?

या निर्णयामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना कॅशलेस उपचारांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. रुग्णालयांनाही वेळेवर आणि योग्य पैसे मिळाल्याने सेवेची गुणवत्ता सुधारेल आणि देशभरात सीजीएचएस संलग्न रुग्णालयांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! लवकरच वेतन आयोग स्थापन होणार, दिवाळीत मिळणार गोड बातमी

हेही वाचा : PF Interest Rate : पीएफ व्याजदराबाबत केंद्राकडून मोठी घोषणा; 7 कोटींहून अधिक लोकांना फायदाच फायदा.!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+