Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

2050 पर्यंत 3.5 दशलक्ष स्तनाच्या कर्करोगाचा जागतिक धोका; मृत्यूच्या संख्येत 44% वाढ होणार?

Breast Cancer Global Study 2050 : आरोग्य क्षेत्रात नवनवीन संशोधने होत असतानाच, मानवी आरोग्यासमोर एका मोठ्या संकटाची चाहूल लागली आहे.

प्रसिद्ध वैद्यकीय जर्नल 'द लॅन्सेट' मध्ये प्रकाशित झालेल्या एका ताज्या अहवालानुसार, स्तनाचा कर्करोग आगामी काळात जागतिक आरोग्य व्यवस्थेसमोर एक गंभीर आव्हान उभे करणार आहे.

जर प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार पद्धतींमध्ये तातडीने सुधारणा केली नाही, तर 2050 पर्यंत जगभरात स्तनाच्या कर्करोगाच्या नवीन रुग्णांची संख्या 3.56 दशलक्षांपर्यंत पोहोचू शकते.

Breast Cancer Global Study 2050

मृत्यूचा आकडा 1.4 दशलक्षांच्या पार जाण्याची भीती

अहवालातील आकडेवारी केवळ धक्कादायकच नाही तर भविष्यातील भीषणतेची जाणीव करून देणारी आहे.

रुग्णसंख्या : 2050 पर्यंत नवीन रुग्णांचा आकडा 2.29 दशलक्ष ते 4.83 दशलक्ष या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

मृत्यूदर : सध्या जागतिक स्तरावर दरवर्षी 7.64 लाख मृत्यू होतात. मात्र, पुढील 25 वर्षांत यामध्ये 44 टक्क्यांनी वाढ होऊन हा आकडा 1.37 दशलक्ष (अंदाजे 14 लाख) पर्यंत पोहोचू शकतो. अनेक देश या वाढत्या संकटाचा सामना करण्यासाठी अद्यापही सज्ज नाहीत, हे तज्ज्ञांचे मत अधिक चिंताजनक आहे.

भारतातील परिस्थिती: 3 दशकांत पाच पटीने वाढ!

भारतासाठी हा अहवाल धोक्याची घंटा वाजवणारा आहे. 1990 पासून भारतात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढले असून गेल्या 30 वर्षांत हा आजार पाच पटीने वाढला आहे. या वाढीची प्रमुख कारणे..!

१. बदलती जीवनशैली : शहरीकरण आणि पाश्चात्य आहार पद्धतीचा वाढता प्रभाव.

२. प्रजनन घटकातील बदल : उशिरा होणारे मातृत्व आणि स्तनपानाचे कमी झालेले प्रमाण.

३. शारीरिक समस्या : वाढती लठ्ठपणाची समस्या आणि व्यायामाचा अभाव.

४. उशिरा निदान : भारतात आजही महिलांमध्ये जनजागृतीच्या अभावामुळे कर्करोगाचे निदान शेवटच्या टप्प्यात होते, ज्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढते.

श्रीमंत विरुद्ध गरीब देश: उपचारांमधील मोठी तफावत

अहवालाने जगातील आरोग्य व्यवस्थेतील विषमता चव्हाट्यावर आणली आहे.

उच्च उत्पन्न असलेले देश : या देशांमध्ये आधुनिक तपासणी आणि प्रगत उपचार पद्धतींमुळे नवीन रुग्णांचे प्रमाण स्थिर असून मृत्यूदरात घट दिसून येत आहे.

कमी आणि मध्यम उत्पन्न असलेले देश : भारत, आफ्रिकन देश आणि इतर विकसनशील देशांमध्ये परिस्थिती उलट आहे. जगातील एकूण नवीन रुग्णांपैकी 27 टक्के रुग्ण या देशांत असले तरी, कर्करोगामुळे होणाऱ्या अकाली मृत्यूंपैकी 45 टक्क्यांहून अधिक मृत्यू याच देशांत होतात.

मुख्य आव्हाने : रेडिओथेरपी उपकरणांची कमतरता, महागडी केमोथेरपी औषधे आणि उपचारांचा अवाढव्य खर्च ही या देशांसमोर मोठी अडथळे आहेत.

वेळ कशाची आहे?

जर आपल्याला 2050ची ही भयावह आकडेवारी बदलायची असेल, तर आताच ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.

नियमित तपासणी: वयाच्या चाळीशीनंतर महिलांनी मॅमोग्राफी आणि नियमित शारीरिक तपासणी करणे अनिवार्य आहे.

आरोग्य पायाभूत सुविधा : ग्रामीण भागापर्यंत कर्करोग निदानाची आणि उपचारांची सोय पोहोचवणे गरजेचे आहे.

जनजागृती : स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यासाठी व्यापक मोहीम राबवणे आवश्यक आहे.

'द लॅन्सेट'चा हा अहवाल केवळ आकडेवारी नाही, तर जगाला दिलेला एक अंतिम इशारा आहे. जर प्रतिबंध, तपासणी आणि उपचारांची साखळी मजबूत केली नाही, तर स्तनाचा कर्करोग ही एक जागतिक महामारी ठरू शकते.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+