Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी ठरतेय खरी? कोरोनानंतर आता 'या' रोगाचा कहर; किती धोकादायक आहे हा आजार!

Baba Vanga's Scary Prediction : जग कोरोना महामारीच्या संकटातून सावरत असतानाच आता 'निपाह' (Nipah Virus) या नव्या जीवघेण्या व्हायरसने डोकं वर काढलं आहे. विशेष म्हणजे, या वाढत्या धोक्यामुळे बुल्गेरियाच्या प्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंगा (Baba Vanga) यांची एक जुनी आणि भयानक भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'निपाह'चा वाढता प्रादुर्भाव पाहता, बाबा वेंगा यांनी वर्तवलेले भाकीत आता सत्यात उतरत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Baba Vanga s Scary Prediction

बाबा वेंगा आणि निपाह कनेक्शन

बाबा वेंगा यांनी अनेक वर्षांपूर्वी भाकीत केले होते की, जग एका अज्ञात आजाराचा सामना करेल जो प्राण्यांमार्फत मानवामध्ये येईल. निपाह व्हायरस हा प्रामुख्याने वटवाघळांपासून मानवामध्ये पसरतो, जे बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीशी मिळतेजुळते आहे. कोरोनाबाबतची त्यांची भविष्यवाणी खरी ठरल्यानंतर आता निपाहच्या संकटामुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

निपाह व्हायरस का आहे 'सायलेंट किलर'?

तज्ज्ञांच्या मते, निपाह व्हायरस कोरोनापेक्षाही अधिक घातक ठरू शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे या व्हायरसचा मृत्यू दर (Mortality Rate) ४०% ते ७५% इतका प्रचंड आहे. हा व्हायरस थेट मेंदूवर हल्ला करतो, ज्यामुळे मानसिक भ्रम, चक्कर येणे आणि शेवटी रुग्ण कोमात जाऊ शकतो. सध्या या आजारावर कोणतीही अधिकृत लस उपलब्ध नसल्याने चिंता अधिक वाढली आहे.

आजार टाळण्यासाठी 'हे' नियम पाळा

  • फळांची तपासणी: पक्षांनी चोच मारलेली किंवा जमिनीवर पडलेली फळे खाणे टाळा.
  • स्वच्छता: सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा आणि हात वारंवार साबणाने धुवा.
  • कच्चा रस टाळा: खजुराचा किंवा ताडीचा कच्चा रस पिणे टाळा, कारण त्यात वटवाघळांची लाळ असण्याची शक्यता असते.
  • संपर्क टाळा: संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणे टाळा.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+