वर्षातून किती वेळा मिळेल 5 लाखांचा लाभ? आयुष्मान कार्डच्या मोफत उपचारांचे नियम आणि मर्यादा काय?
Ayushman Card Limit : देशातील लाखो गरीब कुटुंबांना आरोग्यसुरक्षा कवच देणारी 'आयुष्मान भारत योजना' अनेकदा गैरसमजांमुळे चर्चेत येते. कुटुंबाला मिळणाऱ्या ५ लाख रुपयांच्या मोफत उपचाराच्या वार्षिक मर्यादेवरून अनेक लाभार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. '५ लाखांची मर्यादा म्हणजे वर्षातून एकदाच उपचार घेता येतो का?' असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. मात्र, सरकारने या संदर्भात स्पष्ट नियम ठेवले आहेत.
अनेक लोकांमध्ये 'आयुष्मान कार्ड' वापरून वर्षभर अमर्यादित मोफत उपचार करता येतात, असा गैरसमज आहे. या योजनेत कुटुंबाला मिळणारा ५ लाख रुपयांचा लाभ एका वर्षात तुम्ही कितीही वेळा कसा वापरू शकता आणि नेमक्या कोणत्या गंभीर आजारांवर ही सुविधा लागू आहे, याबद्दल आज आपण जाणून घेऊया, यामुळे तुमच्या मनात कोणताही गैरसमज राहणार नाही.

उपचाराची मर्यादा: वारंवारता नाही, वार्षिक रक्कम महत्त्वाची!
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मिळणारा ५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचाराचा लाभ हा कुटुंबातील सदस्यांच्या संख्येवर नाही, तर संपूर्ण कुटुंबासाठी वार्षिक मर्यादा म्हणून लागू होतो.
कुटुंब आधारित मर्यादा
५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार कुटुंबातील सर्व सदस्य मिळून वर्षभरात वापरू शकतात. नियमानुसार, ५ लाख रुपयांची एकूण मर्यादा संपेपर्यंत एका वर्षात अनेक वेळा मोफत उपचाराची सुविधा घेता येते. म्हणजेच, ५ लाख रुपयांच्या सीमेत मोफत उपचार घेण्यासाठी कोणतीही वेळेची मर्यादा नाही.
कोणत्या आजारांसाठी मोफत उपचार मिळतो?
आयुष्मान कार्डचा लाभ सर्वसामान्य वैद्यकीय खर्चांसाठी नसून, गंभीर आजारांवर रुग्णालयात भरती झाल्यावरच मिळतो. डबल वाल्व रिप्लेसमेंट, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट वाल्व रिप्लेसमेंट आणि विविध प्रकारचे प्रत्यारोपण यांसारख्या जटिल शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारांवर या योजनेतून बिल भरण्याची सोय मिळते.
ओपीडी सल्ला, सामान्य औषधे, एक्स-रे, रक्त तपासणी आणि नियमित तपासणी यांसारखे बाह्य रुग्ण खर्च या योजनेच्या कक्षेत येत नाहीत. योजनेचा मुख्य उद्देश रुग्णालयात भरती होणाऱ्या गंभीर रुग्णांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे.
आयुष्मान कार्ड बनवण्याची सोपी प्रक्रिया
- आयुष्मान कार्ड बनवण्याची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल झाली आहे. APP च्या माध्यमातून पात्र व्यक्ती घरबसल्या अर्ज करू शकतात.
- सर्वप्रथम 'Ayushman App' डाउनलोड करून लाभार्थी म्हणून लॉगइन करा.
- 'PM-JAY', आपले राज्य, जिल्हा आणि आधार क्रमांक निवडून लॉगइन करा.
- लॉगइन केल्यावर कुटुंबातील सदस्यांची यादी दिसेल. ज्या सदस्याचे कार्ड बनले नाही, त्यांच्या नावापुढे 'Authenticate' या पर्यायावर टॅप करून आधार क्रमांक आणि ओटीपीद्वारे सत्यापन करा.
- यावेळी सदस्याचा मोबाईल क्रमांक आणि कुटुंबाशी असलेले नाते नमूद करून ई-केवायसी पूर्ण करून फॉर्म सबमिट करा.
- अर्ज सत्यापित झाल्यानंतर साधारण एका आठवड्याच्या आत ते कार्ड त्याच App वरून डाउनलोड करता येते.












Click it and Unblock the Notifications