Year Ender 2024: या वर्षात सलमान-शाहरुखसह या कलाकारांनाही मिळाल्या जीवे मारण्याच्या धमक्या
Year Ender 2024: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 झाल्यानंतर हत्या झाल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकरांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. यामध्ये सर्वात आघाडीला नाव होत ते म्हणजे बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचं.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्याने सलमानच्या घराबाहेर गोळीबारही केला पण तो त्याच्या योजनेत अपयशी ठरला.

सलमान खान
सलमान खानला या वर्षात एकदा नव्हे तर अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. एकदा त्याचे वडील सलीम खान यांनाही रस्त्याने चालणाऱ्या एका मुलीने धमकावले होते. त्यामुळे सलमानच्या सुरक्षा वाढवण्यात आली होती. सलमान खानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली तेव्हा लॉरेन्स गँगने त्याला अखेरचा अल्टिमेटम दिला होता.
शाहरुख खान
सलमान व्यतिरिक्त बॉलिवूडच्या किंग खान शाहरुख खानलाही या वर्षात अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शाहरुखला ही धमकी छत्तीसगडच्या रायपूरमधून मिळाली होती. फैजान नावाच्या व्यक्तीने नोंदणीकृत क्रमांकावरून धमकीचा फोन केला होता. ज्यामध्ये त्या व्यक्तीने त्यांच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी केली होती. ही बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होत.
विक्रांत मॅसी
बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅसीचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा गोध्रा घटनेवर आधारित आहे. या चित्रपटामुळे अभिनेत्याला जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. खुद्द अभिनेत्याने चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान याचा खुलासा केला होता.
कंगना रणौत
कंगना राणौतचा चित्रपट इमर्जन्सी या वर्षी प्रदर्शित होऊ शकला नसला तरी तो सतत वादात राहिला. या चित्रपटाबाबत तिला अनेकदा धमक्या आल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला होता.












Click it and Unblock the Notifications