Year Ender 2024: या आहेत 2024 मधील सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या वेब सिरीज, पहा लिस्ट
Year Ender 2024: या वर्षीच्या सर्वाधिक पाहिलेल्या वेब सीरीज यादी नुकतीच प्रदर्शित झाली आहे. इंडियन मूव्ही डेटा बेस (IMDb) ने ही यादी प्रसिध्द केली आहे. यामध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या वेब सीरीजचे नाव सर्वात वर आहे. त्यानंतर वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू यांच्या 'सिटाडेल हनी बनी'चा क्रमांक लागतो.
2024 मधील सर्वाधिक पाहिलेल्या वेब सिरीज
'ग्यारह ग्यारह'
'ग्यारह ग्यारह' या वेब सीरीजने रिलीज होताच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. ही वेब सीरीज OTT प्लॅटफॉर्म Zee5 वर रिलीज झाली होती. सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेब सीरिजच्या यादीत या वेब सीरीजचा समावेश करण्यात आला आहे. 'ग्यारह ग्यारह'ची दमदार कथा वेळ प्रवास आणि रहस्य यावर आधारित आहे. 8 भागांच्या या मालिकेत राघव जुयाल, कृतिका कामरा, धैर्य करवा आणि मुक्ती मोहन यांसारखे दिग्गज कलाकारांनी या वेब सीरीजमध्ये आपला दमदार अभिनय केला आहे.

हिरामंडी: द डायमंड बाजार
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची पहिली वेब सिरीज Heeramandi: The Diamond Bazaar ने OTT प्लॅटफॉर्मवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ही वेब सीरीज OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज झाली. 9 भागांची ही वेब सीरीज प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. या वेब सीरीजमध्ये तुम्हाला मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा यांसारख्या नायिका एकत्र पाहायला मिळतील.
'सिटाडेल - हनी बनी'
बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू यांची ॲक्शन-थ्रिलर वेब सीरीज 'सिटाडेल - हनी बनी' लोकांना खूप आवडली आहे. ही वेब सिरीज या वर्षातील सर्वोत्कृष्ट वेब सिरीजपैकी एक आहे. ही वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर उपलब्ध आहे. वरुण आणि सामंथा व्यतिरिक्त यात केके मेनन, सिमरन, सोहम मजुमदार, शिवंकित सिंग परिहार, काशवी मजुमदार, साकिब सलीम आणि सिकंदर खेर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
मिर्झापूर 3
'मिर्झापूर 3' या वेब सीरिजने प्रेक्षकांना तर उत्साहित केलेच आहे पण सोशल मीडियावरही खळबळ उडवून दिली आहे. अनेक दिवसांपासून चाहते या वेब सीरिजच्या प्रदर्शनाची वाट पाहत होते. ही वेब सिरीज चांगलीच लोकप्रिय ठरली. ही वेब सीरिज OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर रिलीज झाली. या वेब सिरीजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, रवि वर्मा, श्वेता त्रिपाठी हे दिग्गज कलाकार पाहायला मिळाले आहेत.
पंचायत 3
The Viral Fever (TVF) च्या बॅनरखाली निर्मित आणि दिपक कुमार मिश्रा दिग्दर्शित कॉमेडी-ड्रामा वेब सिरीज पंचायत 3 ने प्रेक्षकांची मने जिंकली. या वेब सीरीजचा तिसरा भाग रिलीज होण्याची लोक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. वेब सीरीजने रिलीज होताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर खळबळ उडवून दिली. ही वेब सीरीज तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता. या वेब सीरीजमध्ये मुख्य अभिनेता जितेंद्र कुमार एका सचिवाच्या भूमिकेत दिसला होता.












Click it and Unblock the Notifications