Year Ender 2024: 'गुलाबी साडी' पासून 'सजनी रे' पर्यंत 2024 मध्ये या गाण्यांनी यूट्यूब गाजवलं
Most Viewed Songs of 2024 On Youtube: 2024 या वर्षात अनेक ट्रेंडिंग व्हिडिओंसोबतच अनेक सुपरहिट गाण्यांनीही यूट्यूबवर चांगलाच धुमाकूळ घातला. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, या वर्षी यूट्यूबवर भारतीय गाण्यांचा बोलबाला राहिला आहे. त्यात बॉलीवूडच्या गाण्यांपासून पंजाबी आणि साऊथ चित्रपटांपर्यंतच्या गाण्यांचा समावेश आहे.
2024 या वर्षाने आतापर्यंत अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. बॉलीवूड, साऊथ चित्रपटांपासून ते स्वतंत्र संगीतापर्यंत सगळीकडेच धुमाकूळ आहे. तर चला मग 2024 मध्ये यूट्यूबवर सर्वाधिक वेळा पाहिली गेलेली गाणी कोणती आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

'लव्ह या'
प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझचे 'लव्ह या' हे गाणे प्रचंड लोकप्रिय झालं आहे. हे गाणे 6 जानेवारी 2024 रोजी यूट्यूबवर अपलोड करण्यात आले होतं. आतापर्यंत 470 दशलक्षाहून अधिक वेळा हे गाणं पाहिले गेले आहे.
'गुलाबी साडी'
'गुलाबी साडी' हे गाणे मराठमोळ्या गायक संजू राठोडने गायलं आहे. हे एक लोकप्रिय मराठी गाणे आहे. या गाण्यांनी २०२४ हे वर्ष प्रचंड गाजवलं आहे. अनेक मोठ्या सोहळ्यात ही गुलाबी साडी गाणं ऐकायला मिळालं. उद्योगपती मुकेश यांच्या मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात या गाण्यावर अनेक बॉलिवूड कलाकार थिरकताना दिसले. हे 6 फेब्रुवारी 2024 रोजी YouTube वर अपलोड करण्यात आले होते. आतापर्यंत 213 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे 2024 मध्ये रिल्स व्हिडिओ आणि इंस्टाग्राम रील्समध्ये वापरले गेले आहे.
'अंखियां गुलाब'
शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांच्या 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटातील 'अंखियां गुलाब' हे रोमँटिक गाणे लोकांना आवडले आहे. हे गाणे 24 जानेवारी 2024 रोजी यूट्यूबवर अपलोड करण्यात आले होते आणि आतापर्यंत 166 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे.
'सजनी रे'
'लापता लेडीज' चित्रपटातील 'सजनी रे' हे गाणे 2024 मध्ये खूप लोकप्रिय झालं आहे. हे अरिजित सिंग, राम संपत आणि प्रशांत पांडे यांनी एकत्र गायले आहे. हे गाणे 12 फेब्रुवारी 2024 रोजी यूट्यूबवर अपलोड करण्यात आले होते.या गाण्याला 6 कोटींहून अधिक वेळा पाहिलं गेले आहे.
'हीर आसमानी'
'फायटर' चित्रपटातील 'हीर आसमानी' हे गाणे खूप भावूक गाणं आहे. हे गाणे बी प्राक, विशाल ददलानी आणि शेखर रावजियानी यांनी गायलं आहे. हे गाणे 8 जानेवारी 2024 रोजी यूट्यूबवर अपलोड करण्यात आले होते. आतापर्यंत 56 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेलं आहे.
'पुष्पा
पुष्पा' साऊथचा प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाचा 'पुष्पा पुष्पा' हा टायटल ट्रॅक लोकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे. हे गाणे मिका सिंग आणि नकाश अजीज यांनी एकत्र गायलं आहे. हे गाणं 1 मे 2024 रोजी YouTube वर अपलोड करण्यात आले होते. आतापर्यंत 70 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.












Click it and Unblock the Notifications