Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पूनम पांडेच्या मृत्यूची अफवा ते अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटापर्यंत, हे प्रकरण यावर्षी चर्चेत

Year Ender 2024: आता 2024 वर्ष संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. लोक आता नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण 2024 मध्ये अनेक बॉलिवूड स्टार्सच्या आयुष्यात चढ-उतार पाहायला मिळाले. कोणाच्या मृत्यूची खोटी अफवा असो की, मग एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कायदेशीर अडचणीत सापडला. 2024 मधील बॉलिवूडमधील काही ठळक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

कंगना राणौत

6 जून रोजी नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौतला चंदीगड विमानतळावर एका सीआयएसएफच्या कॉन्स्टेबलने थप्पड मारली होती. कंगनाने 'शेतकऱ्यांचा अपमान' केला आहे म्हणून थप्पड मारण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. कुलविंदर कौर असे या घटनेत सहभागी असलेल्या कॉन्स्टेबलचे नाव आहे. यानंतर कंगना राणौतची सुरक्षा वाढवण्यात आली होती.

abhishek bachchan aishwarya rai

पूनम पांडेच्या मृत्यूची खोटी अफवा

मॉडेल असलेल्या पूनम पांडेचा मृत्यू झाल्याची बातमी 2 फेब्रुवारीला समोर आली. तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेयर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये पुनम पांडेचा वयाच्या 32 व्या वर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होत. या पोस्टमुळे सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला होता. काही लोकांना बातमीच्या सत्यतेवर शंका आली. त्यानंतर काही दिवसांनंतर अभिनेत्रीने इन्स्टा वर लाईव्ह करुन घोषित केले की ती जिवंत आणि बरी आहे.

कंगना राणौतच्या इमर्जन्सी चित्रपटावरून वाद

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट सुरुवातीला 6 सप्टेंबरला प्रदर्शित करण्याचं नियोजित होतं. पण सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र न दिल्याने तो वादात अडकला. काही शीख संघटनांनी या चित्रपटाचा निषेध केला आणि शीख समुदायाचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप केला. आता या चित्रपटाची रिलीज डेट 25 जानेवारी निश्चित करण्यात आली आहे.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या अफवा

प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात अभिषेक आणि ऐश्वर्या स्वतंत्रपणे पोहोचले होते. यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला जोर आला. या जोडप्यामध्ये सर्वकाही ठिक नसल्याचे बोलले जात होते. या सर्व प्रकरणाला खुद्द बच्चन कुटुंबच जबाबदार आहे. मात्र, या जोडीन एका कार्यक्रमात एकत्र येऊन घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम दिला.

रवीना टंडन वादात

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती रोड रेजच्या तीव्र घटनेत सामील होती. मुंबईत भरधाव वेगात गाडी चालवल्याच्या आरोपात अभिनेत्री आणि तिच्या ड्रायव्हरवर जमावाने हल्ला केला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही स्थानिक रवीना आणि तिच्या ड्रायव्हरने महिलेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. मुंबईतील कार्टर रोडवरील तिच्या राहत्या घराजवळ रिझवी कॉलेजजवळ ही घटना घडली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+