Shahrukh Khan : काश्मीरशी शाहरुख खानचे अनोखे नाते; पण अजूनही त्याने काश्मीर पाहिले नाही? हे आहे कारण
Why has Shahrukh Khan never visited Kashmir : शाहरुख खान हा आघाडीचा अभिनेता भारतच नव्हे तर जगातही त्याचे लाखो चाहते आहेत, सिनेरसिक या अभिनेत्याला आणि त्याच्या चित्रपटाला डोक्यावर घेतात, शाहरुखकडे पैशांचीही काही कमी नाही पण त्याने भारताचे नंदनवन असलेले काश्मीर अद्याप पाहिलेले नाही..याचे एक मोठे कारण समोर आले आहे.
शाहरुखने आतापर्यंत काश्मीर का पाहिले नाही, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण त्याचे उत्तर आम्ही देणार आहोत, जे ऐकून तुम्हाला अभिमान वाटेल तर चला जाणून घेऊया शाहरुखच्या काश्मीरमध्ये न जाण्याचे कारण..

काश्मीरमध्ये का गेलेला नाही शाहरुख खान?
शाहरुख खान आपल्या कुटुंबाला खूप जीव लावतो. त्याची मुलगी असो की मुलगा आणि त्याचे वडीलही..सर्वांसाठी तो काही न् काही करत असतो. ज्या शाहरुखला त्याच्या वडीलांनी घडवले आणि ज्यांच्या आशीर्वादामुळे तो आज आघाडीचा अभिनेता आहे त्या वडीलांसाठी त्याने काश्मीर पाहिलेले नाही. आता तुम्ही म्हणाल की हे काय..पण होय ही गोष्ट खरीय खुद्द शाहरुखनेच या गोष्टीचा खुलासा केलेला आहे.
काय म्हणाला होता शाहरुख खान?
अलीकडेच, शाहरुखने अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या शोला भेट दिली. त्यावेळी त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. ज्या ऐकूण अनेकांना अभिमान वाटला. कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात त्याने वडिलांना दिलेले वचन पाळल्याबद्दल माहिती दिली. त्यावेळी शाहरुख म्हणाला की, मी आजही वडीलांनी दिलेले वचन पाळतो.
शाहरुख खानने आजपर्यंत काश्मीरला का भेट दिली नाही?
शाहरुखने वडिलांना दिलेले वचन पाळले आणि काश्मीरला भेट दिली नाही. वडील म्हणाले होते की, माझ्याशिवाय काश्मीर पाहू नकोस. याचा संदर्भही शाहरुख खानने दिला आहे. शाहरुखने शोमध्ये सांगितले की, 'माझ्या वडिलांनी मला सांगितले की, मला आयुष्यात तीन ठिकाणी जायचे आहे- इस्तंबूल, रोम आणि काश्मीर. पण ते म्हणाले की, तू माझ्याशिवाय रोम आणि इस्तंबूल पाहू शकतोस, पण काश्मीर माझ्याशिवाय पाहू नकोस, मी तुला दाखवतो.
..म्हणून शाहरुखची इच्छा अधुरी राहीली
वडील आणि मुलगा (शाहरुख खान) काश्मीर पाहावे ही शाहरुखच्या वडीलांची इच्छा होती, पण वडिलांच्या निधनानंतर ती गोष्ट शाहरुख पुर्ण करु शकत नव्हता. त्यामुळे कितीही संधी मिळाल्या तरीही त्यांनी काश्मीरला जाण्यापासून तो स्वःतला थांबवतो कारण वडीलांनी सांगितलेली गोष्ट त्याच्या मनात आजही कायम आहे.
शाहरुख खानचे काश्मीरशी नाते काय?
शाहरुख खान आजही काश्मीरशी जुळलेले आहे. त्याचे काश्मीरसोबत एक अनोखे नाते आहे. कदाचित हे तुम्हाला माहिती नसेल पण त्याची आजी काश्मिरी होती, त्यामुळे त्यांचे काश्मीरशी घट्ट नाते होते. मात्र तरीही त्याने आजपर्यंत काश्मीरला भेट दिलेली नाही कारण वडिलांनी दिलेले वचन तो पाळतोय.












Click it and Unblock the Notifications