Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सलीम खान पुन्हा व्हेंटिलेटरवर! सलमान खान काळजीत, कोण आहेत सलीम खान? ज्यांची लेखणी खूपच गाजली

Who is salim khan legendary writer health update : भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास ज्यांच्या लेखणीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे दिग्गज पटकथा लेखक सलीम खान सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. मेंदूतील रक्तस्त्रावामुळे (ब्रेन हॅमरेज) त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

मंगळवारपासून रुग्णालयात असलेल्या सलीम खान यांना पुन्हा एकदा वेंटिलेटरवर हलवण्यात आल्याच्या वृत्ताने संपूर्ण बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. शाहरुख खानसह अनेक बड्या ताऱ्यांनी रुग्णालयात धाव घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

Who is salim khan legendary writer health update

कोण आहेत सलीम खान? अभिनयाने सुरुवात, पण लेखणीने गाजवलं जग!

  • आजच्या पिढीसाठी सलीम खान ही केवळ 'सुपरस्टार सलमान खानचे वडील' अशी ओळख असली, तरी भारतीय सिनेमाच्या सुवर्णकाळाचे ते खऱ्या अर्थाने 'शिल्पकार' आहेत.
  • 'सलीम-जावेद' या सुवर्ण जोडीचा उदय: २४ नोव्हेंबर १९३५ रोजी जन्मलेल्या सलीम खान यांनी आपल्या करिअरची सुरुवात अभिनेता म्हणून केली होती. मात्र, खरा चमत्कार तेव्हा घडला जेव्हा त्यांची भेट जावेद अख्तर यांच्याशी झाली. या जोडीने भारतीय चित्रपटसृष्टीला 'लेखक' या पदाचा सन्मान मिळवून दिला. मानधनाच्या बाबतीत हिरोइतकेच पैसे घेणारे ते पहिले लेखक ठरले.

'अँग्री यंग मॅन'ची निर्मिती

अमिताभ बच्चन यांना 'अँग्री यंग मॅन' म्हणून ओळख मिळवून देणारे 'जंजीर' सारखे चित्रपट सलीम खान यांच्या लेखणीतूनच उतरले. त्यांनी नायक केवळ रोमँटिक असू शकतो, हा समज मोडून काढला आणि अन्यायाविरुद्ध लढणारा नायक जन्माला घातला.

अजरामर चित्रपट

शोले, दीवार, डॉन, काला पत्थर, हाथी मेरे साथी, त्रिशूल आणि सीता और गीता यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची कथा, पटकथा आणि संवाद सलीम खान यांनीच लिहिले आहेत. त्यांच्या चित्रपटांमधील संवाद आजही लोकांच्या जिभेवर आहेत.

कौटुंबिक वारसा

सलीम खान यांनी केवळ सिनेमेच दिले नाहीत, तर खानदानही तितकंच समृद्ध केलं. दोन लग्नं करूनही त्यांनी आपलं कुटुंब अत्यंत एकोप्याने सांभाळलं आहे. सलमान, अरबाज आणि सोहेल ही त्यांची मुलं आज बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+