23 नंबरची अंगठी! नताशानंतर हार्दिक पांड्याच्या आयुष्यात 'ती' कोण? करोडोंची मालकीण ब्लॅक बेल्ट होल्डर

Who is Mahika Sharma Hardik Pandya's New Love Interest : भारतीय क्रिकेटचा 'पॉवर-हाऊस' हार्दिक पांड्या सध्या मैदानापेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. नताशा स्टेनकोविकसोबतचे नाते संपुष्टात आल्यानंतर, हार्दिकच्या आयुष्यात एका नव्या 'एन्ट्री'ची चर्चा रंगली आहे. ती व्यक्ती आहे २४ वर्षांची मॉडेल आणि अभिनेत्री माहिका शर्मा!

एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसलेली 'ती' २३ नंबरची अंगठी आणि मुंबई विमानतळावर त्यांची कथित उपस्थिती... या दोन गोष्टींनी चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. ग्लॅमर आणि फिटनेसच्या दुनियेत धुमाकूळ घालणारी ही सुंदर माहिका शर्मा नेमकी कोण आहे आणि करोडो रुपयांची कमाई करणारी ही तरुणी हार्दिकच्या आयुष्यात 'स्पेशल वन' बनणार का? वाचा या नव्या कथेचा सविस्तर उलगडा...

Who is Mahika Sharma Hardik Pandya s New Love

१. कोण आहे माहिका शर्मा?

दिल्लीत जन्मलेली आणि वाढलेली माहिका शर्मा (वय २४) एक अभिनेत्री, मॉडेल आणि फिटनेस कंटेंट क्रिएटर आहे. तिचे इन्स्टाग्राम प्रोफाइल तिची आलिशान जीवनशैली आणि फिटनेस पॅशन दर्शवते, ज्यामुळे ती सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाली आहे. अर्थशास्त्र आणि फायनान्समध्ये पदवी घेतल्यानंतर तिने कॉर्पोरेट क्षेत्रात इंटर्न म्हणून काम केले, परंतु लवकरच ती मॉडेलिंग आणि अभिनयाच्या दुनियेकडे वळली.

२. अभिनय आणि मॉडेलिंगमधील करिअर

माहिका शर्माने रॅपर रागाच्या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. ऑस्कर विजेत्या डॉक्युमेंटरी दिग्दर्शक ऑरलँडो वॉन आइनसिडेल यांच्या 'इंटू द डस्क' या चित्रपटातही ती दिसली होती. विवेक ओबेरॉय स्टारर चित्रपट 'पीएम नरेंद्र मोदी' (२०१९) मध्ये दिसल्यानंतर तिला खरी ओळख मिळाली. २०२४ मध्ये 'इंडियन फॅशन अवॉर्ड्स'मध्ये तिला 'मॉडेल ऑफ द इयर' पुरस्कार मिळाला, जो तिच्या वाढत्या यशाचा पुरावा आहे.

३. कमाई आणि संपत्ती

माहिका शर्मा केवळ मॉडेलिंग आणि अभिनयातूनच नव्हे, तर फिटनेस उद्योगातूनही पैसे कमावत आहे. ती एक सर्टिफाइड योगा ट्रेनर आहे, तसेच 'लीन सिक्स सिग्मा ब्लॅक बेल्ट होल्डर' (Lean Six Sigma Black Belt Holder) देखील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्लीतील या मॉडेलची अंदाजित नेटवर्थ सुमारे ३.२ कोटी रुपये इतकी आहे.

४. दोघांच्या चर्चेला सुरुवात कशी झाली?

काही दिवसांपूर्वी माहिका शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये तिच्यामागे हार्दिक पांड्या दिसला होता. या व्हिडिओमध्ये हार्दिकच्या बोटात त्याच्या जर्सी क्रमांकाशी मिळती-जुळती '२३' नंबरची अंगठी दिसली. यानंतर लगेचच दोघांना मुंबई विमानतळावर एकत्र पाहण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. महत्त्वाचे म्हणजे, दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+