'ठरलं तर मग...' फेम पुर्णा आजी-ज्योती चांदेकर यांचे निधन! तेजस्वीनी पंडित यांच्या आईबद्दल जाणून घ्या
Who is Jyoti Chandekar : मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे निधन झाले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजाराने त्यांचा मृत्यू झाला असून चांदेकर यांच्या निधनाने मराठी नाट्य, सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांनी २०१५ पासून त्या मराठी चित्रपट आणि मालिकेत सक्रिय होत्या.
ज्योती चांदेकर तेजस्विनी पंडित यांच्या होत्या आई
ज्योती चांदेकर या लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या आई होत्या.आईचे निधन झाल्याने तेजस्विनी पंडित यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ज्योती चांदेकर या मराठीतील दिग्गज पंडितच्या आई होत्या. तेजस्विनी पंडित यांनीच आईकडून कलेचा वारसा घेत तो यशस्वी पुढे नेला. आई-मुलीची जोडी २०१५ च्या पुरस्कार विजेत्या दीप्ती घोंसीकर दिग्दर्शित 'तिचा उंबरठा' या चित्रपटात काम केले होते. ज्योती चांदेकर यांनी चित्रपटात तेजस्विनी पंडितच्या सासूची भूमिका साकारली होती आणि या जोडीने २०१५ च्या झी गौरव पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला होता.
कोण होत्या ज्योती चांदेकर? (Who is Jyoti Chandekar)
ज्योती चांदेकर या मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री होत्या. ज्योती चांदेकर यांनी मी सिंधुताई सपकाळ (२०१०) आणि गुरु (२०१६) या चित्रपटांमध्येही काम केले आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या तिच्या चित्रपटात मुरली नल्लापा दिग्दर्शित 'देवा एक अतरंगी' हा चित्रपट समाविष्ट आहे.
ज्योती चांदेकर यांचे चित्रपट..
- गुरू (२०१६)
- ढोलकी (२०१५)
- तिचा उंबरठा
- दमलेल्या बाबाची कहाणी
- पाऊलवाट (२०११)
- मी सिंधुताई सपकाळ (२०१०)
- सलाम (२०१४)
- सांजपर्व (२०१४)
ज्योती चांदेकर यांना मिळालेले पुरस्कार
ज्योती चांदेकर यांनी ठरलं तर मग या मालिकेत दमदार भूमिका केली होती. पुर्णा आजीच्या भूमिका रसिकांना चांगलीच भावली. या मालिकेचा सध्या इतर दोन मालिकांसोबत महासंगम टीव्हीवर इपिसोडमध्ये दाखवला जात असून त्यांनी या मालिकेत पुर्णा आजीची भूमिका भक्कम सांभाळली होती. मिसेस आमदार सौभाग्यवती हे त्यांचे नाटक आहे.
नाट्य परिषदेच्या पुणे शाखेर्फे ज्योती चांदेकर यांना जीवनगौरव पुरस्कार (२०१७) प्रदान करण्यात आला होता. २०१५ चा झी गौरव पुरस्कार तेजस्विनी पंडितसह ज्योती चांदेकर यांना मिळाला होता.












Click it and Unblock the Notifications