कोण आहे आलिया फाखरी? नर्गिस फाखरीच्या बहिणीला अटक, माजी प्रियकराच्या हत्येचा आरोप
बॉलीवूड वर्तूळातून एक मोठी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी हिची धाकटी बहीण आलिया फाखरी हिला तिचा माजी प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या हत्येप्रकरणी न्यूयॉर्क येथे अटक करण्यात आली आहे. तसेच आलियावर दोन मजली असलेल्या गॅरेजला आग लावण्याचा आरोप करण्यात आला आहे.
आलियाचा माजी प्रियकर एडवर्ड जेकब्स हा प्लंबर असून तो तीन मुलांचा पिता होता. वर्षभरापूर्वीच त्यांचे नाते संपुष्टात आले होते. मात्र आलियाने त्याला सतत आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. वारंवार नकार मिळत असल्यामुळे तीने गॅरेजला आग लावण्याचा पवित्रा घेतला असल्याचं सांगितलं जातं आहे. आलिया फाखरी ही नर्गिस फाखरीची धाकटी बहीण आहे. ती तिचे आई-वडील मोहम्मद फाखरी आणि मेरी फाखरी यांच्यासोबत क्वीन्स न्यूयॉर्क येथे राहते.

नर्गिसने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम करून नाव कमावलं आहे. नर्गिस मागील काही दिवसांपासून बॉलिवूड पासून दूर आहे. नर्गिस ही तिची बहीण आलियासोबतचे फोटो फार कमी प्रमाणात सोशल मीडियावर शेअर करते. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आहे. रिपोर्ट्सनुसार दोन बहिणींमध्ये 20 वर्षांहून अधिक काळ संपर्कात नाहीत. अगदी नर्गिसला तिच्या बहिणीच्या अटकेची बातमी मीडियाकडून मिळाली आहे.
दरम्यान आलिया आणि नर्गिसची आई मेरी फाखरी यांनी आपल्या मुलीवर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाला की, "माझी मुलागी कोणाची हत्या करेल, असं मला वाटत नाही". ती नेहमीच सर्वांची मदत करायची." रिपोर्टनुसार मेरीने सांगितले की, एका मोठ्या अपघातानंतर आलियाला ओपिओइड्सचे व्यसन लागलं होतं. तिच्या आईला वाटतं की, या व्यसानाने त्यांच्या मुलीच्या वागणुकीवर परिणाम झाला आहे.
आलियावर फर्स्ट डिग्री मर्डर आणि संबंधित आरोप ठेवण्यात आले आहेत. तिला जामीन नाकारण्यात आला आहे. या प्रकरणात आलिया जर दोषी आढळल्यास तिला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. त्याची पुढील न्यायालयीन हजेरी 9 डिसेंबर रोजी होणार असून ती सध्या पोलीस कोठडीत आहे.












Click it and Unblock the Notifications