विवेकची बॉलिवूड कारकीर्द फ्लॉप,तरीही तो 1200 कोटीच्या संपत्तीचा मालक, जाणून घ्या सर्व काही
Vivek Oberoi Net Worth: बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉयची गणना अशा अभिनेत्यांमध्ये केली जाते ज्यांनी आपल्या करिअरमध्ये सर्वाधिक फ्लॉप चित्रपट दिले आहेत. पण असे असूनही त्याच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर या बाबतीत त्याने बॉलिवूडमधील अनेक टॉप कलाकारांना मागे टाकले आहे.
अलीकडेच विवेक ओबेरॉयने एक आलिशान रोल्स रॉयस कलिनन कार खरेदी केली आहे. ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. या कारची किंमत जवळपास 12 कोटी रुपये आहे. ही लक्झरी खरेदी इंटरनेटवर चर्चेचा विषय बनली आहे. विशेष त्याच्या चित्रपट कारकिर्दीतील चढ-उतार पाहता त्याने ही कार कशी खरेदी केली हे जाणून घेण्यासाठी लोक प्रचंड उत्सुक आहेत.

अनेकांना माहित नसलेली गोष्ट म्हणजे विवेकने सिनेमाबाहेरही भरपूर संपत्ती कमावली आहे. तो भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला विवेक ओबेरॉयची एकूण संपत्ती किती आहे आणि त्याने इतकी कमाई कशी केली हे सांगणार आहोत.
विवेकने 2002 मध्ये 'कंपनी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. हा चित्रपट त्याच्यासाठी खूप हिट ठरला होता. यानंतर त्यांनी साथियां, मस्ती, ओंकारा सारखे यशस्वी चित्रपट दिले आहेत. त्यावेळी त्यांची कारकीर्द शिखरावर होती. मात्र ऐश्वर्या रायसोबतचे त्याचे नाते आणि सलमान खानसोबतचा वाद त्याच्या कारकिर्दीत अडथळा ठरला असल्याचं बोललं जातं. सलमान खानसोबतच्या वादामुळे त्याला चित्रपट मिळणे बंद झालं, असं बॉलिवूड वर्तूळात म्हटलं जातं.
बॉलिवूडमधील करियरला एवढ्या अडचणी असूनही, विवेकने स्वतःला पुन्हा सावरलं. त्याने विशेष तेलुगु आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले. त्याबरोबरच काही लोकप्रिय वेब सिरीज इनसाइड एजमध्येही तो दिसला. पण तुम्हाला माहित आहे का की विवेकचे यश केवळ त्याच्या अभिनय कारकिर्दीतून आलेले नाही?
कालांतराने विवेकने मोठा व्यवसाय उभा केला आहे. द स्टेट्समनच्या रिपोर्टनुसार विवेकची एकूण संपत्ती 1200 कोटी रुपये आहे. जी रणबीर कपूर आणि अल्लू अर्जुन सारख्या अनेक बड्या कलाकारांपेक्षा जास्त आहे.विवेकने करिअरच्या सुरुवातीला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याचे सांगितले जाते. प्रॉपर्टीच्या कामात गुंतलेली कर्मा इन्फ्रास्ट्रक्चर नावाची कंपनी त्यांनी सुरू केली. त्यासोबतच तो मेगा एंटरटेनमेंट नावाच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा सह-संस्थापक देखील आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो रास अल खैमाह, संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे असलेल्या Aqua Arc नावाच्या 2300 कोटी रुपयांच्या रिअल इस्टेट प्रकल्पाशी देखील संबंधित आहे. याबरोबरच विवेक स्वर्णिम विद्यापीठाचा सह-संस्थापक देखील आहे.












Click it and Unblock the Notifications