Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Virat Kohli Anushka Sharm Dance : विराट कोहली - अनुष्काचे ठुमके! दुबईतील डान्स शूटचा व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Anushka Sharm Dance in dubai : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे मनोरंजन तसेच क्रिकेट जगतातील सर्वात प्रसिद्ध जोडपे म्हणावे लागेल. दोघेही आपापल्या क्षेत्रात भक्कम नाव कमवत आहेत. दोघेही दिसण्यात भारी आणि वागण्यातही संस्कारी अशी ही जोडी कधी देवाच्या दारी दिसते तर कधी मनमुरात आनंद लुटताना दिसते.

अशातच दोघांचा दुबईतील एक फोटो व्हायरल झाला आहे. या जोडीचा एक अलीकडील व्हिडिओ ऑनलाइन प्रसारित झाला आहे, दुबईतील एका शूटच्या क्लिपमध्ये विराट आणि अनुष्का एकत्र नाचताना दिसत आहेत, त्यात बॅकग्राउंड डान्सर्सचा एक गट सामील झाला आहे.

Virat Kohli Anushka Sharm Dance

कॅज्युअल पोषाखात डान्स

दुबईमध्ये एका शोचे शूटिंग सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये विराट आणि अनुष्का काही ग्रुप डान्सर्ससोबत डान्स करताना दिसतात. प्रत्येकजण आनंदी दिसत असताना, हे कपल कॅज्युअल पोशाखांमध्ये धमाकेदार डान्स करत आहेत चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे आणि ते हार्ट इमोजी शेअर करत आहेत.

या व्हिडिओत जरी सर्वजण स्वत: चा आनंद घेत असल्याचे दिसत असले तरी, खास कपडे घातलेले विराट आणि अनुष्का हे जोडप्यांच्या मनमोहक अदांकडेच सर्वांचे लक्ष जात असल्याचे व्हिडिओतून जाणवते.

अनुष्का विराटचे अनोखे नाते

अनुष्का आणि विराट एकमेकांचे भावबंध खूप अनोखे आहेत. ते मंदिरात जातात तेव्हा पारंपारिक पोषाखात असतात, अनु्ष्का तर भारतीय नारी ज्याला म्हणतात त्या साडीच्या पोषाखात असते आणि दोघेही मनोभावे देवाची पुजा करताना अनेकदा दिसतात.

विराट आणि अनुष्का जेव्हा मिठी मारतात..

मार्चमध्ये, जेव्हा टीम इंडियाने 12 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, तेव्हा केवळ विजयानेच लक्ष वेधले नाही - तर त्यानंतर आलेला हृदयस्पर्शी क्षण देखील होता. शेवटची शिट्टी वाजताच, विराटने अनुष्काला मिठी मारण्यासाठी थेट स्टँडमध्ये प्रवेश केला होता. हा हावभाव संपूर्ण इंटरनेटवर हृदय पिळवटून टाकणारा होता. एका विशेष आनंददायक क्लिपमध्ये, विराटला अगदी चपखल 'ठुमका'लावताना आणि तिला जवळ धरताना, क्षणात स्पष्टपणे आनंद व्यक्त करताना दिसला.

डिसेंबर 2017 मध्ये इटलीच्या टस्कनी येथे विवाह समारंभात या जोडप्याने लग्नगाठ बांधली. जानेवारी 2021 मध्ये मुलगी वामिकाचे आगमन आणि फेब्रुवारी 2024 मध्ये मुलगा अकायचा जन्म झाल्याने त्यांचे कुटुंब वाढले आहे.

हेही वाचा : विराट कोहलीला BCCI ने T20 वर्ल्डकपचे दिले हे 'छोटे' बक्षीस! व्हिडिओ पहा, किंमत ऐकून बसेल धक्का!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+