800 कोटींचा गल्ला जमवणाऱ्या 'छावा'त संभाजी महाराजांची भूमिका करणारा विकी कौशल्य आता या नव्या भुमिकेत
Vicky Kaushal : छावा चित्रपटातून अभूतपुर्व यश मिळवणाऱ्या विकी कौशल हा अभिनेत्याच्या लोकप्रियेतत मोठी वाढ झाली आहे. छावाने सुमारे 800 कोटींचा गल्ला जमवला, बाॅक्स ऑफिसवर छावाने सर्व रेकाॅर्ड मोडल्यात जमा आहे. अशा स्थितीत या सिनेमाचा अभिनेता आता कोणत्या भुमिकेत झळकणार याचीच उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
छावाच्या यशाआधीही विकी कौशल लोकप्रिय होता आणि त्याच्या यशात आणि लोकप्रियतेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेने लोकप्रियतेत भर घातली आहे. संभाजी महाराजांचे कार्य आणि त्यांचा संघर्ष साऱ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहित आहे. त्यामुळे या भुमिकेचा त्याला फायदा झाला अशातच आता विकी कौशल्य एका मोठ्या बड्या भुमिकेत पुन्हा दिसणार आहे.

विकी कौशल कुणाच्या भुमिकेत दिसणार?
आम्ही तुम्हाला सांगतो की, विकी कौशल हा गुणी अभिनेता आता एका ऑलिम्पियनच्या भुमिकेत दिसणार आहे. अर्थात हा चित्रपट या ऑलिम्पीयनच्या जीवनावर आहे. यावेळी विकी कौशल आपल्या एका मोठ्या प्रकल्पावर काम करत आहे, तो संजय लिला भंसाळींसोबत लव्ह अँड वार या चित्रपटात तो भूमिका साकारणार आहे. त्याच्यासोबत आलिया भट्ट आणि रणवीर कपूर हे दोन स्टारकास्ट दिसणार आहेत.
शरत कमल यांची काय आहे इच्छा?
भारतीय टेबल टेनिस चॅम्पियन तथा ऑलम्पिक खेळाडू शरत कमल यांनी इच्छा व्यक्त केली की, विकी कौशल याने त्यांच्या बायोपिकमध्ये काम करावे, यासंदर्भात शरत कमल यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आणि आपली इच्छा व्यक्त केली. त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, त्यांच्यावर आधारीत बायोपीक बनत असेल तर त्यात कोणत्या कलाकाराने त्यांची भूमिका करावी? यावर शरत कमल यांनी स्पष्ट केले की, विकी कौशलने आपल्या बायोपीकमध्ये काम केले तर त्यांना आवडेल
विकी कौशल बायोपीकमध्ये काम करेल का?
शरत कमल यांच्यावरील बायोपीकसाठी त्यांना उंचपुरा कलाकार हवा आहे आणि ती अट विकी कौशल पुर्ण करतो कारण त्याची उंचीही या ऑलम्पियनशी साजेशी आहे..जर विकी कौशल त्यांच्या चित्रपटात काम करेल का हे माहित नाही पण असे झाले तरीही या बायोपीकला खूप वेळ लागू शकतो.
बायोपीकआधी बनावे पुस्तक
शरत कमल यांना जरी विकी कौशलला त्यांच्या बायोपीकमध्ये असावे असे वाटत असले तरीही त्यांना चित्रपटाआधी स्वःतवर पुस्तक असावे असे वाटते कारण त्यातून व्यक्तिमत्वाचा वेध घेता येतो आणि चित्रपट बनवायला याची मदत होते.












Click it and Unblock the Notifications