दिवाळीत चित्रपटांची असेल मेजवाणी; भूल भुलैया- 3 आणि 'सिंघम अगेन'मध्ये रंगत; 'शो' वरुन रंगला वाद!
Bhool Bhulaiya-3 Vs Singham Again : दिवाळी सण म्हटले की आनंदोत्सव. मौज मजा फराळ, फटाके अन् बरच काही अशी ओळख आहे. तर दिवाळीच्या सुट्टीमध्ये आणखी एक गोष्ट लोक आनंदाने लुटतात ती म्हणजे चित्रपटांची मेजवाणी. यंदाच्या दिवाळीतही चित्रपटांची मेजवणी असणार आहे. कारण, यंदाच्या दिवाळीत दोन मोठे चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्ये कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' आणि अजय देवगणचा 'सिंघम अगेन'. चाहते दोन्ही चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि दोन्ही चित्रपट एकत्र प्रदर्शित होऊन बॉक्स ऑफिसवर जबरदस्त एकमेकांना टक्कर देणार यात कोणतीही शंका नाही.
'भूल भुलैया 3' ची कथा अन् कलाकार
'भूल भुलैया 3' हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. ज्यामध्ये कार्तिक आर्यन पुन्हा रूह बाबाच्या भूमिकेत असणार आहे. मागील चित्रपटांप्रमाणे यावेळीही कॉमेडी आणि हॉररचा अनोखा मेळ या चित्रपटात घातलेला पाहायळा मिळणार आहे. यावेळी विद्या बालन आणि माधुरी दीक्षित देखील मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हेच चाहत्यांचे सर्वात मोठे आकर्षण असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे, ज्यांनी यापूर्वी या मालिकेतील चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

'सिंघम अगेन'मध्ये काय खास?
'सिंघम अगेन' हा रोहित शेट्टीच्या लोकप्रिय कॉप युनिव्हर्सचा भाग आहे. ज्यामध्ये आधीच अजय देवगणची सिंघम मालिका, रणवीर सिंगची सिम्बा आणि अक्षय कुमारची सूर्यवंशी चित्रपटांचा समावेश आहे. यावेळी अजय देवगणसोबत करीना कपूर, रणवीर सिंग, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि दीपिका पदुकोण यांसारखे मोठे कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात भरपूर ॲक्शन, थरार आणि दमदार संवाद असतील, जे प्रेक्षकांना भुरळ घालणार आहेत. त्यामुळे दिवाळीत प्रेक्षकांना चांगलीच मेजवाणी असणार आहे.
शो वितरणावरुन सद्या वाद
चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे चित्रपटगृहांमधील 'शो' च्या संख्येवरूनही वाद निर्माण झाला आहे. काही माध्यमांच्या हवाल्यानुसार , 'सिंघम अगेन' दिग्दर्शक रोहित शेट्टीने PVR Inox सारख्या मोठ्या थिएटर चेनसह त्याच्या चित्रपटाच्या 60% शोची पुष्टी केली आहे. याशिवाय अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सनाही सर्व शो 'सिंघम अगेन'ला देण्यास सांगण्यात आलेले आहे.
तर दुसरीकडे,'भूल भुलैया 3' ची निर्मिती करणाऱ्या टी-सीरीजने याप्रकरणी भारतीय स्पर्धा आयोगाकडे (CCI) तक्रार केल्याचे सांगितले जात आहे. शोचे वितरण 50 ते 50 टक्के असावे, जेणेकरून दोन्ही चित्रपटांना समान संधी मिळावी, अशी टी-सीरीजची इच्छा आहे. सीसीआय ही एक सरकारी संस्था आहे. जी अशा समस्यांचे निराकरण करते जेणेकरून बाजारात हेल्दी स्पर्धा टिकून राहते आणि ग्राहकांनाही त्याचा लाभ होतो.
बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांची स्पर्धा
दिवाळीत दोन मोठ्या चित्रपटांचा एकत्र टक्कर बॉक्स ऑफिससाठी मनोरंजक असेल. 'भूल भुलैया 3' आपल्या हॉरर-कॉमेडी आणि मनोरंजनाने प्रेक्षकांना आकर्षित करेल, तर 'सिंघम अगेन' आपल्या दमदार ॲक्शन आणि मोठ्या स्टार कास्टने चाहत्यांना आकर्षित करेल. दोन्ही चित्रपटांचे निर्माते बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करण्यासाठी सज्ज आहेत. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी त्यांनी पूर्ण तयारी देखील केलेली आहे.
या दिवाळीत थिएटरमध्ये भूल भुलैया ३ आणि सिंघम अगेनची जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये सध्या सुरू असलेल्या शो शेअरिंगच्या वादाचीही बरीच चर्चा आहे. प्रेक्षकांना कोणता चित्रपट अधिक आवडेल आणि कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर अधिक कमाई करेल, हे तर आता काळच ठरवणार आहे व तितकेच उत्सुकतेचे ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications