Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सिनेविश्वावर शोककळा! 'दैवाचा क्रूर खेळ'; 'या' अभिनेत्रीचा भीषण रस्ते अपघातात 'करुण' अंत!

Theatre Actress Aditi Mukherjee Passes Away in Road Accident : एका क्षणात रंगमंच सोडून नियतीच्या पडद्याआड गेलेल्या एका उभरत्या कलाकाराबाबत हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.अस्मिता थिएटर ग्रुपची प्रतिभावान अभिनेत्री आदिती मुखर्जी यांचे नोएडाजवळ झालेल्या एका अत्यंत भीषण आणि क्रूर रस्ते अपघातात दुःखद निधन झाले आहे. थिएटर जगताला हा मोठा धक्का बसला आहे.

गौतम बुद्ध युनिव्हर्सिटीकडे जात असताना झालेल्या या दुर्घटनेत डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले व काळाने आदिती मुखर्जी या प्रतिभावान कलाकाराला हिरावून घेतले. या घटनेने संपूर्ण रंगभूमीच्या जगात अकाली शोककळा पसरवली आहे!

Theatre Actress Aditi Mukherjee Passes Away

कसा घडला अपघात?

आदिती मुखर्जी आज १९ नोव्हेंबर रोजी नोएडातील गौतम बुद्ध युनिव्हर्सिटी येथे आयोजित एका महत्त्वाच्या थिएटर कार्यक्रमात भाग घेण्यासाठी त्यांच्या घरातून निघाली होती. नोएडा येथील परी चौक या वर्दळीच्या ठिकाणी तिच्या कॅबला एका भरधाव आणि वेगवान वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, आदिती मुखर्जींना गंभीर दुखापती झाली. तिला तातडीने ग्रेटर नोएडा येथील शारदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक बनली होती.

शर्थीच्या उपचारानंतर प्राणज्योत मालवली

डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपयोग झाला नाही आणि उपचारादरम्यान आदितीने अखेरचा श्वास घेतला. आदितींच्या निधनाची बातमी कळताच रंगभुमी जगताला मोठा धक्का बसला. ज्या कार्यक्रमासाठी ती निघाली होती, त्याच कार्यक्रमाच्या मंचावरून तिा श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ही दुःखद बाब..

कोण होती आदिती मुखर्जी?

  • आदिती मुखर्जी या दिल्लीच्या थिएटर जगतातील एक आश्वासक आणि प्रतिभावान चेहरा म्हणून ओळखली जात होती. त्या सुप्रसिद्ध 'अस्मिता थिएटर ग्रुप'ची माजी विद्यार्थिनी होती.
  • २०२२ च्या बॅचची अत्यंत टॅलेंटेड परफॉर्मर म्हणून तिने नाट्यक्षेत्रात आपली ओळख निर्माण केली होती. दिल्लीतील महिपालपूर येथे ती तिचे बंधू अरिंदम मुखर्जी यांच्यासोबत राहत होती. तिचे मूळ घर ओडिशा येथे असून, अपघाताची बातमी मिळताच तिचे आई-वडील ओडिशाहून दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
  • आदिती यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले होते. विशेषतः, बॉलिवूड अभिनेते आशुतोष राणा आणि राहुल भूचर यांच्यासोबत त्यांनी लोकप्रिय नाटक 'हमारे राम' मध्ये अभिनय केला होता.
  • तिचे गुरू आणि प्रसिद्ध थिएटर दिग्दर्शक अरविंद गौर यांनी सोशल मीडियावर आदितींच्या निधनाची माहिती देऊन दुःख व्यक्त केले आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+