धर्मवीर-2' चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख पुढे ढकलली, निर्मात्यांनी सांगितलं 'हे' मोठं कारण
मुंबई : धर्मवीर' आनंद दिघे यांच्यावर आधारित असलेल्या या चित्रपटानं लोकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं आपली जादू पसरवली होती. या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर आता 'धर्मवीर 2 ' प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
चाहते 'धर्मवीर 2' ची आतुरतेनं वाट पाहत होते. धर्मवीर पार्ट 2 चित्रपट 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र आता अचानक 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची तारीख पुढे ढकल्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. मात्र तारीख पुढे ढकलण्याचे कारण काय याचे स्पष्टीकरण निर्मात्यांनी दिले आहे.

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'धर्मवीर-2' चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 'धर्मवीर 2' चित्रपट येत्या 9 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता, मात्र चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 'धर्मवीर-2' चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलण्याचं मोठं कारणही समोर आलं आहे.
'धर्मवीर 2' चित्रपटाच्या निर्मात्यांचा अनोखा निर्णय घेत राज्यातील पूरपरिस्थितीमुळे 'धर्मवीर - 2' चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं. बहुचर्चित 'धर्मवीर - 2' या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडलं आहे. 9 ऑगस्टला "धर्मवीर - 2" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात सुरु असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे हे अस्मानी संकट पाहता निर्मात्यांनी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं आहे.
धर्मवीर 2 चित्रपटाचा टीजर, गाणी आणि ट्रेलरला सोशल मीडियातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या चित्रपटाबाबत निर्मात्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. आता चित्रपट 9 ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही. दरम्यान, आता हा धर्मवीर 2 चित्रपट 9 ऑगस्ट ऐवजी कोणत्या तारखेला प्रदर्शित होणार याबद्दल कोणतीही माहिती निर्मात्यांकडून देण्यात आलेली नाही
चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई म्हणाले, की गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूर जन्य परिस्थिती निर्माण झाली आहेत, काही गाव पाण्याखाली गेली असून काही गावांचा संपर्कही तुटला आहे. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहता "धर्मवीर - 2" हा चित्रपट 9 ऑगस्टला प्रदर्शित करणे योग्य वाटत नाही.
महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यांत पाणी असताना, त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी असताना त्याच काळात चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा परिस्थितीचा आढावा घेऊन आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करू असे सांगितले आहे. त्यामुळे चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबतची नक्की तारीख स्पष्ट झालेली नाही.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications