'छावा' कोणत्या OTT वर दिसणार? OTT वर कधी येणार? महत्त्वाची माहिती आली समोर
सध्या सगळीकडे 'छावा' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. जेव्हापासून या चित्रपटाचा प्रोमो आला तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत आला. त्या चित्रपटातील एका गाण्यावरुन चांगलंच वादंग उठल्यानंतर तो जास्त चर्चीला जाऊ लागला. अखेर वादग्रस्त गाणे वगळून हा चित्रपट 14 डिसेंबरला प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. प्रत्येक ठिकाणी अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंधनाच्या चर्चा सुरु आहेत. या चित्रपटाचं सध्या आगाऊ बूकिंग सुरु असतानाच हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार, हा प्रश्न विचारला जात आहे.

छावा ओटीटीवर येणार
छावा हा चित्रपट मेडॉक चित्रपटाच्या बॅनर अंतर्गत बनवण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ओटीटी रिलीज संबंधीचे सर्व अधिकार देण्याची बोलणी केल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे ओटीटी प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असून तो लवकरच ओटीटीवर दिसेल, असे बोलले जात आहे. 'छावा'चित्रपटातील प्री-क्रेडिट्स पाहून हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे समजले होते.
या दिवशी होणार प्रदर्शित?
निर्मात्याने ओटीटी प्रदर्शनाची बोलणी केल्याचे सांगितले जात असले तरी, हा चित्रपट नेमका कधी ओटीटीवर येईल, हे अजून ठरलेले नाही. चित्रपट प्रदर्शनाला फक्त दोन दिवस उलटल्यानंतर या चित्रपटाने दोन दिवसांत ७० कोटींचा गल्ला कमवला. आज रविवारी हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा सहज पार करेल असे सांगितले जात आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत असल्याने तो येत्या दोन महिन्यांत ओटीटीवर प्रदर्शित होईल, असा अंदाज आहे.












Click it and Unblock the Notifications