“तुझेच मी गीत गात आहे”ची अखेर; अभिजित खांडकेकर भावूक
मुंबई: अभिजित खांडकेकर हा मराठी अभिनेता सध्या प्रत्येक मराठी घरात लाडका आहे. झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेल्या "माझ्या नवऱ्याची बायको" या मालिकेने लोकप्रियतेचे सगळे उच्चांक मोडले. गुरु - शनाया आणि राधिका हे त्रिकुट तेव्हा घराघरात चर्चेत होते. सूत्रसंचालक म्हणूनही अभिजित चांगलाच लोकप्रिय झाला.

स्टार प्रवाह या वाहिनीवर सुरु असलेली त्याची "'तुझेच मी गीत गात आहे" ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. त्यामुळे अभिजित भावूक झाला आहे. आपल्या भावना त्याने एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. अभिजित आपल्या पोस्टमध्ये म्हणतो,
अडीच वर्षांचा प्रवास आज अखेर संपतोय....
प्रत्येक मालीकेच्या निमित्तानं कलाकारांचं एक नवं कुटुंब तयार होतं , त्यांच्या बरोबर आम्ही हसतो, रडतो, भांडतो, खिदळतो आणि अचानक एके दिवशी आता उद्याचा कॉलटाइम येणार नाही, " ए तू किती वाजता उद्या?" , "आज डब्यात तूझ्यासाठी खास आणतेय हा.."
" च्यायला ट्राफिक लागला यार आज खूप" , "चलो चलो जल्दी घर जाना है..." हे सगळे संवाद बंद होणार ही कल्पनाच सहन होत नाही.
आता हा चॅप्टर संपवून नविन काहीतरी सुरू होईल हे सिंक इन व्हायला च वेळ लागतो...पण आम्हा ॲक्टरस् च हे असच असतं....तरीही तुझेच च्या निमित्ताने तयार झालेले हे बंध आयुष्यभरासाठी आहेत. अवनी तायवडे , अवनी जोशी म्हणजेच स्वरा आणि पिहू ने मला बापपणाचा अनुभव दिला. कांचन गुप्ते ने आई सारखी माया दिली. सचिन, उमेश , शैलेश , हार्दिक , विघ्नेश , केदार , प्रथमेश, सागर ,अभिजीत च्या रूपात भाऊ मिळाले.पल्लवी सारखी आदर्श वहिनी, बहीण मिळाली,प्रिया , तेजस्विनी, उर्मिला सारख्या आयुष्यभराच्या मैत्रीणी..
प्रत्येकाबद्दल भरपूर लिहीता येईल ... पण ते लिहीण्यापेक्षा एका कडकडीत मिठीतून जास्त नीट पोहोचेल...
सतिश राजवाडे सर, अजिंक्य , मधूरा , महिपाल जी, अभिजीत गुरू, वर्षा, उत्तरा, सुवर्णा ताई , संपूर्ण ट्रम्पकार्ड टीम आणि स्टार प्रवाह टीम चे मनापासून आभार
रसिक प्रेक्षकांना दंडवत .. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य नाही.
'तुझेच मी गीत गात आहे ' च्या निमित्ताने वडील आणि मुलीची शेवटी भेट होते आणि त्याचा शेवटचा भाग आज 'फादर्स डे' च्या निमित्ताने प्रसारीत होतोय याहून अनोखा योगायोग अजून कुठला. पुन्हा नव्या भुमिकेतून आपल्या समोर येत राहीनच. असंच प्रेम आणि आशिर्वाद असू द्या.












Click it and Unblock the Notifications