The Bhootnii collection day 1 :'द भूतनी' बॉक्स ऑफिसवर किती कमवेल?, पहिल्या दिवसाची कमाई घ्या जाणून
Bhootnii Box Office Collection Day 1 Prediction : आज दोन हिंदी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. त्यापैकी एक म्हणजे - अजय देवगण- रितेश देशमुख स्टारर 'रेड 2' आणि दुसरा चित्रपट म्हणजे संजय दत्त-मौनी रॉय स्टारर हॉरर कॉमेडी 'द भूतनी'. दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
स्क्रीन स्पेसच्या बाबतीत, 'रेड 2' खूप पुढे गेला आहे तर 'द भूतनी' खूप कमी स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे. कमी शोज मिळाले असले तरी, द भूतनीला पहिल्या दिवशी चांगली कमाई होण्याची अपेक्षा आहे.

'द भूतनी' च्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनचा अंदाज
बॉलीवूड हंगामाच्या अंदाजानुसार, द भूतनी पहिल्या दिवशी 3 ते 4 कोटी कमवू शकते. तो कमी स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. पण द भूतनीचे रिव्ह्यू चांगले आहे. याचा फायदा चित्रपटाला होऊ शकतो. कमी स्क्रीनवर प्रदर्शित होत असूनही, हा चित्रपट आठवड्याच्या शेवटी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई करू शकतो. हा चित्रपट गुरुवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चार दिवसांचा वीकेंड येत आहे. आज महाराष्ट्रातही सुट्टी आहे. अशा परिस्थितीत, या चित्रपटाला तोंडी प्रचाराचा फायदा मिळू शकतो.
'द भूतनी' हा चित्रपट आधी 18 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. त्यानंतर बॉक्स ऑफिसवर 'केसरी 2' सोबत त्याची टक्कर झाली. त्यानंतर निर्मात्यांनी तो पुढे ढकलला आणि 1 मे रोजी प्रदर्शित केला. आता 'रेड 2' सोबत स्पर्धा आहे. पहिल्या दिवसाच्या कमाईत दोघांची तुलनाच नाही. अजय देवगणच्या 'रेड 2' ला बंपर ओपनिंग मिळण्याची अपेक्षा आहे.
'द भूतनी' चित्रपटाची लांबी आणि सेन्सॉर प्रमाणपत्र
'द भूतनी' हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. सेन्सॉर बोर्डाने त्याला UA16+ प्रमाणपत्र दिले आहे. चित्रपटाटा टायमिंग 2 तास 10 मिनिटे आहे. यावेळी संजय दत्त एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. आजकाल हॉरर कॉमेडी चित्रपटांना खूप पसंती दिली जात आहे. अलिकडेच, मुंज्या आणि स्त्री २ ला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. अशा परिस्थितीत, निर्मात्यांना आशा आहे की या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळेल.
भूतनी चित्रपटात या कलाकारांचा समावेश
'द भूतनी' चित्रपटात संजय दत्त, पलक तिवारी, सनी सिंग, आसिफ खान यांच्याशिवाय मौनी रॉय देखील मुख्य भूमिकेत आहे. यामध्ये मौनी रॉयच्या पात्राचे नाव 'मोहब्बत' आहे, जो एक भूत आहे. 'द भूतनी'ची निर्मिती सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट प्रोडक्शनच्या बॅनरखाली दीपक मुकुट आणि संजय दत्त यांनी केली आहे. हुनर मुकुट आणि मान्यता दत्त या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.












Click it and Unblock the Notifications