Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'ओम शांती ओम'वर अंबानी कुटुंबाचा अफलातून डान्स

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नसोहळ्याची धूम सध्या सुरु आहे. अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांचा संगीत सोहळा नुकताच पार पडला. या संगीत सोहळ्यात अख्या अंबानी कुटुंबाने ओम शांती ओमवर केलेला अफलातून डान्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलत आहे.

Anant Ambani and Radhika

या लग्न सोहळ्यांत अनेक कार्यक्रम होणार असून, त्यात भारतासह जगभरातील दिग्गजही सहभागी होणार आहेत. अनंत व राधिका यांच्या संगीत सोहळ्याला बॉलीवूडच्याही अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सलमान खान, माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे, विद्या बालन यांसह अनेक कलाकार या सोहळ्याला सहकुटुंब उपस्थित होते. सध्या अंबानींच्या या सोहळ्याची बरीच चर्चा सुरु आहे. त्यातच कुटुंबियांचा डान्स हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्नाआधी दोन प्री वेडिंगचे सोहळे पार पडले. एक सोहळा हा गुजरातमधील जामनगर येथे पार पडला. तर दुसरा सोहळा या परदेशात आलिशान क्रूझवर पार पडला. त्यानंतर मागील काही दिवसांपासून त्यांच्या लग्नसोहळ्यांच्या विधीला सुरुवात झाली आहे. 12 तारखेला शुभ विवाह सोहळा, 13 तारखेला शुभ आशीर्वाद सोहळा आणि 14 तारखेला रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे.

कुणी केला ओम शांती ओमवर डान्स?

मुकेश अंबानी, पत्नी नीता अंबानी, मोठा मुलगा आकाश अंबानी, सून श्लोका अंबानी, लेक ईशा अंबानी आणि जावई यांच्यासह अनंत आणि राधिका अंबानी यांनी या सोहळात एकत्र डान्स केला. ओम शांती ओम या गाण्यावर ही मंडळी थिरकली. या सोहळ्याला उपस्थित असलेल्या बॉलीवूडकरांच्या समोर अंबानीं कुटुंबाने त्यांचा डान्स सादर केला. या डान्सची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.

सलमान, रणबीर, माधुरीची उपस्थिती

या संगीत सोहळ्याला बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. सलमान खान, आलिया भट्ट, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे, विद्या बालन हे कलाकार उपस्थित होते. तसेच अनंत अंबानीचा सलमान खान सोबतचा डान्स देखील विशेष चर्चेत आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+