Tanushree dutta : "मैं बिस्तर शेअर नहीं करती हूं" तनुश्री दत्ताने नाकारली 1 कोटी 65 लाखांची ऑफर..
Tanushree dutta rejects bigg boss offer : बाॅलीवूडची नटी आणि आशिक बनाया आपने चित्रपटाची नायिका तनुश्री दत्ता ही सध्या फारच चर्चेत आहे. तिचे एक वक्तव्य जाणून आश्चर्य वाटेल कारण तिने नाकारलेल्या ऑफरबद्दल यात मोठा खुलासा यात केला आहे.
अलिकडेच तनुश्री दत्ता हिने एक खुलासा केला. बिग बाॅसचे निर्माते तिला बिग बाॅसमध्ये आणण्यासाठी मागील दहा वर्षांपासून प्रयत्न करत आहेत, पण तनुश्री दत्ताने यावर साफ नकार देत वक्तव्य केले आहे.

बिग बाॅसमध्ये येण्यासाठी १.६५ कोटींची ऑफर नाकारली
तनुश्री दत्ताच्या खुलाशानुसार, तिला बिग बाॅस निर्मात्याकडून १.६५ लाख रुपयांची बक्कळ रकमेची ऑफर आली होती, परंतु या ऑफरला तिने नाकारले. यानंतर सोशल मीडियावर यासंदर्भात वृत्त येत असून 'बिग बॉस'बद्दल इतका तिटकारा का? असे चाहते आता तनुश्री दत्ताला विचारत आहेत.
"मी एवढी स्वस्त नाही.." - तनुश्री दत्ता
तनुश्री दत्ताने बिग बाॅसच्या ऑफरसंदर्भात 'बाॅलीवूड ठिकाणा'च्या मुलाखतीत म्हटले की, "खरंतर तुम्हाला वाटतं का मी बिग बाॅसमध्ये जाईल? तो माझा पिंड नाही, मला १.६५ कोटींची ऑफर आली. माझ्यासारख्या काही बाॅलीवूड कलाकारालाही एवढेच दिले गेले. बिग बाॅसमध्ये आल्यानंतर माझ्या खाण्यापिण्यासंदर्भात लक्ष देऊ असा मला फोन आला, पण मी स्पष्ट म्हटले की, चंद्राचा तुकडा दिला तरी मी येणार नाही" तनुश्री दत्ताचे हे खास अंदाजातील उत्तर ऐकून चाहत्यांनीही वाहवा.. म्हटले.
"मै बिस्तर शेअर नही करती..."- तनुश्री दत्ता
तनुश्री दत्ता मुलाखतीत पुढे म्हणाली, "बिग बाॅसमध्ये पुरुष आणि महिला एकाच हाॅलमध्ये झोपतात अन् भांडतातही, सर्वकाही तिथेच होते मी असे करु शकत नाही. मी माझी शक्ती आणि आहाराबद्दल जागरुक आहे. एखाद्या रिअलिटी शोसाठी मी माझा बेड शेअर करेल अशी मी दिसते का "असा सवालही तिने केला आणि मला माझी प्रायव्हसी अनमोल असल्याचे म्हटले.
"शांततेत काम करण्याची संधी मिळाली तर मी यापेक्षाही जास्त काम करेल हा माझा विश्वास आहे. बिग बाॅसच्या घरात चोवीस तास कॅमेऱ्यासमोर नाटक करायचं नाहीच..." नो- वे असे ती म्हणाली.
"मला प्रायव्हसी महत्वाची.. पैसे नाही.."
तनुश्री दत्ताने आपल्या खासगी जीवनाला खूप महत्व देते यासंदर्भात तिला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिचा खासगी जीवनाला सार्वजनिक करण्यास ठाम नकार दिसून आला. "मी माझ्या व्हिज्युअल प्रायव्हसीबाबत समझोता करणार नाही..त्याची कितीही किंमत दिली तरीही.." असे तनुश्री दत्ताने म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications