Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Tamannaah Bhatia Birthday : तमन्ना भाटियाची संपत्ती पाहून तु्म्ही व्हाल थक्क, वाचा तिच्या करिअरविषयी

Tamannaah Bhatia Net worth : बॉलीवूडपासून दक्षिणेतील चित्रपटांपर्यंत आपला अभिनय, नृत्य कौशल्य आणि सौंदर्य दाखवणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. तमन्नाने 2005 मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

तमन्ना भाटियाचे पदार्पण

तमन्ना भाटियाने 'चांद सा रोशन चेहरा' या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. गेल्या काही वर्षांत तिने बॉलीवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये उत्तम अभिनय केला आहे. या अभिनेत्रीने कठोर परिश्रम करून करोडोंची संपत्ती कमावली आहे.

तमन्ना भाटिया आज तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी जाणून घेऊया तमन्नाच्या संपत्तीविषयी अन् तिने कशी केली कमाई..!

Tamannaah Bhatia Birthday

तमन्ना भाटियाचे संपत्ती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2018 मध्ये तमन्ना भाटियाने IPL समारंभात 10 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी 50 लाख रुपये आकारले होते. आम्ही तुम्हाला सांगतो की, अभिनेत्री मुंबईतील अनेक मालमत्तांची मालक आहे. तमन्ना मुंबईतील जुहू-वर्सोवा लिंक रोडवरील बेव्ह्यू अपार्टमेंटच्या 14व्या मजल्यावर राहते. तिचा हा फ्लॅट खूप सुंदर आहे.

झूम टीव्हीच्या रिपोर्टनुसार, 80,778 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या अपार्टमेंटची किंमत 16.60 कोटी रुपये आहे. याशिवाय अभिनेत्रीने मुंबईत आणखी तीन अपार्टमेंट 7.84 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. मुंबईतील लोखंडवाला आणि अंधेरी पश्चिम भागात या मालमत्ता आहेत.

तमन्ना भाटियाची कमाई आणि एकूण संपत्ती

-तमन्ना भाटिया 120 कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीची मालक आहे.

-फिल्म कारकिर्दीव्यतिरिक्त, तमन्ना भाटिया सोशल मीडिया आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून देखील भरपूर कमाई करते. ती अनेक नामांकित ज्वेलरी ब्रँड्स, ऑनलाइन शॉपिंग साइट्स, सॉफ्ट ड्रिंक्स, इलेक्ट्रॉनिक ब्रँड्सचा लोकप्रिय चेहरा आहे.

तमन्ना भाटियाचे कार कलेक्शन

-तमन्ना भाटियाकडे अनेक आलिशान कार आहेत. त्याच्या कार कलेक्शनमध्ये BMW 320i, ज्याची किंमत आहे 43.50 लाख रुपये, मर्सिडीज-बेंझ GLE, ज्याची किंमत आहे 1.02 कोटी रुपये, मित्सुबिशी पजेरो स्पोर्ट, ज्याची किंमत आहे 29.96 लाख रुपये आणि लँड रोव्हर रेंज रोव्हर डिस्कव्हरी स्पोर्ट कार, जी आहे 75.59 लाख रुपये आहे.

तमन्ना भाटियाची विलासी जीवनशैली

-तमन्ना भाटियाच्या कलेक्शनमध्ये 3,01,396 रुपयांची गुच्ची बॅग, 2,57,889 रुपयांची YSL क्रॉसबॉडी बॅग आणि सापाच्या कातड्याची बॅग आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+