टी सीरीजचे सहमालक कृष्ण कुमार यांच्या मुलीचं वयाच्या 21 व्या वर्षी झालं निधन
Krishan Kumar Daughter Death: बॉलिवूड अभिनेता आणि टी-सीरीज कंपनीचे सह-मालक कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमार यांचे निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी तिशाचा कर्करोगाने मृत्यू झाला.
कर्करोगामुळे झाला मृत्यू :
मीडिया रिपोर्ट्सनुसार तिशाचा कर्करोगामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. तिशाला कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबईहून जर्मनीला नेण्यात आले होते.पण 18 जुलै 2024 रोजी जर्मनीतील रुग्णालयात तिशाचा मृत्यू झाला. या बातमीनंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

टी-सीरीज कंपनीच्या प्रवक्त्याने तिशाच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.कंपनीकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे की - कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमार यांचे कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर 18 जुलै 2024 रोजी निधन झाले.तिशा ही टी सीरीजचे एमडी भूषण कुमार यांची चुलत बहीण होती. 21 वर्षीय तिशा कुमारच्या निधनामुळे तिचे कुटुंबावर दु:खाचा कोसळला आहे. टिशा ही टी सीरीजचे एमडी भूषण कुमार यांची चुलत बहीण होती.
कृष्णा कुमार हे गुलशन कुमार यांचे धाकटे भाऊ आहेत :
कृष्णा कुमार हे संगीत कंपनी टी-सीरीजचे दिवंगत संस्थापक आणि चित्रपट निर्माता गुलशन कुमार यांचे धाकटे भाऊ आहेत. कृष्ण कुमार यांनी 90 च्या दशकात चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणूनही काम केले होते. कृष्ण कुमारने 1993 मध्ये रिलीज झालेल्या 'आजा मेरी जान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तो 1993 मध्ये 'कसम तेरी कसम' आणि 'शबनम' सारख्या चित्रपटांमध्येही दिसला होता, पण तो बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून यशस्वी होऊ शकला नाही.
कृष्णा कुमारचे बॉलिवूड करिअर:
कृष्णा कुमार 1995 मध्ये रिलीज झालेल्या 'सनम बेवफा' चित्रपटातही दिसले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्यामुळे त्याला लोकप्रियताही मिळाली. तिशाचे वडील कृष्ण कुमार शेवटचे 2000 मध्ये आलेल्या 'पापा द ग्रेट' चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट जरी फ्लॉप ठरला. यानंतर कृष्णा कुमारने अभिनयापासून दुरावले.












Click it and Unblock the Notifications