रोहमन शॉल सुष्मिता सेनला डेट करत आहे? रिलेशनशिपच्या अफवांवर सोडले मौन,'आम्ही 6 वर्षांपासून ...'
Sushmita Sen Rohman Shawl: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.सुष्मिता तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण 2021 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले.
रोहमन शॉलसोबत ब्रेकअप झाल्यानंतरही सुष्मिता सेन अनेकदा त्याच्यासोबत स्पॉट झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता दोघांचे पॅचअप झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अलीकडेच सुष्मिता सेनने रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, ती गेल्या 3 वर्षांपासून अविवाहित आहे. यावर आता रोहमनने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

इन्स्टंट बॉलीवूडशी संवाद साधताना रोहमन शॉलने सुष्मिता सेनसोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितले. तो म्हणाला की सुष्मिता आणि माझे खूप चांगले नाते आहे. जेव्हा रोहमनला त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, 'आम्ही दोघे गेल्या 6 वर्षांपासून एकत्र आहोत, यात नवीन काय आहे?' रोहमन शॉल पुढे म्हणाला, 'आम्ही दोघे नेहमीच चांगले मित्र होतो आणि राहू. आमच्या दोघांमध्ये खूप चांगले नाते आहे जे सर्वांसमोर दिसते. मात्र, रोहमन शॉलने सुष्मिता सेनसोबतच्या रिलेशनशिपच्या अफवांचे खंडन केले नाही.रोहमन शॉलचे केवळ सुष्मिता सेनसोबतच नाही तर तिच्या दोन्ही मुलींसोबतही चांगले संबंध आहेत.
काही दिवसांपूर्वी सुष्मिता सेनने रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्ट 'चॅप्टर 2' च्या पहिल्या एपिसोडमध्ये भाग घेतला होता. संवादादरम्यान सुष्मिता म्हणाली होती की, 'माझ्या आयुष्यात सध्या एकही माणूस नाही. मी जवळपास ३ वर्षे अविवाहित आहे. 2021 पासून मी कोणाशीही रिलेशनशिपमध्ये नाही. आता मी या आयुष्यात खूप आनंदी आहे.
2018 मध्ये सुष्मिता सेनने रोहमन शॉलसोबतचे नाते सार्वजनिक केले होते. पण 3 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2021 मध्ये दोघांचे ब्रेकअप झाले. मात्र यानंतरही दोघं पुन्हा एकत्र दिसत आहेत. यानंतर कपलच्या पॅचअपच्या बातम्या येऊ लागल्या. आता या दोघांनी रिलेशनशिपच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.












Click it and Unblock the Notifications