कपडे घ्या कपडे..! मिस युनिव्हर्सची भाभी विकतेय कापडं; नेटकरी म्हणतात, हे काय चालल्लंय...
प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेनची एक्स भावजई सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर तीने सध्या कापड विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. कापड, सूट विकतानाचा तिचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. तो पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर नाके मुरडली. मात्र या सगळ्या प्रकारात सुष्मिताची भाची जियाना सेन मात्र तिच्या मोहक अदांनी नेटकऱ्यांची मने जिंकत आहे.

कोण आहे चारु असोपा?
सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि अभिनेत्री चारू असोपा यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. नात्यात कटुता आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याला आता वेगळे होऊन दोन वर्षे झाली आहे. या दोघांना जियाना नावाची चार वर्षांची मुलगीही आहे. हे दोघेही वेगळे झाले असले तरी, जियानाचा सांभाळ हे दोघेही करतात.
चारुचा व्हिडीओ व्हायरल
राजीव सेन आणि चारू असोपा यांच्या घटस्फोटाला २ वर्षे झाली. आता चरितार्थासाठी चारू कपडे व सूट विकत आहे. तिचा सूट विकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत. मिस युनिव्हर्सची वहिनी असूनही, ही परिस्थिती कशी आली, असंही नेटकरी विचारत आहेत. या सगळ्या गदारोळात सुष्मिता सेनची भाची आणि चारूची लहान मुलगी जियानाची स्टाईल पाहिली तर कोणीही तिच्या प्रेमात पडेल. जियानाचे फोटोही सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत.

राजस्थानी पोशाखात जियाना सेन
जियाना तिच्या आई चारू आणि आत्या सुष्मिता सारखी खूप सुंदर आहे. विशेषतः जेव्हा ती पारंपारिक पोशाख घालते तेव्हा तिचा गोंडसपणा आणखी वाढतो. तिने पारंपारिक शैलीत हा नारंगी रंगाचा ड्रेस घातला आहे. पारंपारिक पोशाखात चनिया चोळी आणि दुपट्टा असतो. लेहेंग्यावर सोनेरी फुलांची भरतकाम आहे आणि दुपट्ट्याची बॉर्डर देखील सोनेरी आहे. जे लूक आकर्षक बनवत आहे.












Click it and Unblock the Notifications