गणपती बाप्पा मोरया... सूरज चव्हाणने घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन, ट्राँफी ठेवली बाप्पााच्या चरणी

रविवारी (6 ऑक्टोबर) बीग बाँसचा पाचवा सिझन संपला. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या या स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे बारामतीचा सूरज चव्हाण विजेता ठरला. तर प्रसिद्ध गायक अभिजीत सावंत हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला. सोशल मीडियावर धूमाकूळ घालणाऱ्या सूरजने बीग बाँसच्या घरातही धुमाकूळ घातला. काल सायंकाळी उशीरा हे दोघेही मुंबईतील सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेले. तेथे सूरजने आपल्याला मिळालेली ट्राँफी सिद्धीविनायकाच्या चरणी ठेवत गणपती बाप्पा मोरया, जय श्रीराम अशा घोषणा दिल्या. सूरज व अभिजितचा सिद्धीविनायकाचे दर्शन घेतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Suraj Chavan

अपेक्षेप्रमाणे सूरज झाला विजयी

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाच्या महाअंतिम फेरीपर्यंत १७ सदस्यांपैकी सहा सदस्य पोहोचले. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी हे टॉप-६ सदस्य होते. यामध्ये सर्वात आधी जान्हवी किल्लेकरने ९ लाखांची सुटकेस घेऊन खेळ सोडला. त्यानंतर अंकिता, धनंजय आणि निक्की असे अनुक्रमे हे सदस्य नॉमिनेट झाले. अखेरीस सूरजने बाजी मारून 'बिग बॉस'ची ट्रॉफी हाती घेतली. पहिल्या दिवसापासून आपल्या स्वभावाने मनं जिंकणारा सूरज चव्हाण विजयी झाला. तर अभिजीत सावंत हा उपविजेता झाला. अशातच सूरज आणि अभिजीतने सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

सिद्धीविनायकाच्या दर्शनाचे व्हिडीओ व्हायरल

प्रसार माध्यमांशी संवाद साधल्यानंतर सूरज आणि अभिजीतने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. सूरजने गणपती बाप्पासमोर बिग बॉसची ट्रॉफी ठेवली आणि त्यांचे मनापासून आभार मानले. 70 दिवस बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर सूरज आणि अभिजीत यांनी सर्वांत आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. सूरजने 'बिग बॉस'ची ट्रॉफी बाप्पाच्या चरणी ठेवली. "गणपती बाप्पा मोरया", "जय श्रीराम" असा जयघोष करताना सूरज दिसला. याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 'टीआरपी मराठी' या इन्स्टाग्रामवर सूरज आणि अभिजीतचे फोटो, व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. सूरजने गणपती बाप्पासमोर बिग बॉसची ट्रॉफी ठेवली आणि त्यांचे मनापासून आभार मानले. ं

सूरजला मिळाले 14 लाख रुपये

आज (मंगळवार) सकाळी सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत यांनी मुंबईतल्या दादर इथल्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. सूरज आणि अभिजीतवर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सूरज आणि अभिजीतसोबतच निक्की तांबोळी, धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर हे टॉप 5 मध्ये पोहोचले होते. तर जान्हवी किल्लेकर 9 लाख रुपये घेऊन घराबाहेर पडली होती. 'बिग बॉस मराठी 5' जिंकल्यानंतर सूरजला 14.6 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. त्याचसोबत 10 लाख रुपयांचं ज्वेलरी वाऊचर मिळालं. इतकंच नव्हे तर त्याला इलेक्ट्रीक स्कूटरसुद्धा मिळाली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+