Sunny Deol Net Worth: एवढ्या संपत्तीचा मालक आहे सनी देओल, असं आहे त्याचं चित्रपट करियर
Sunny Deol Net Worth: आपल्या दमदार अभिनय आणि डॉयलॉगनी रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालणारा सनी देओल सध्या त्याच्या 'जाट' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सनी देओल त्याच्या जुन्या अंदाजात दिसत आहे, त्यामुळे लोकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. दोन दिवसांपुर्वीच हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
सनी देओलचा जाट हा चित्रपट त्याच्या काही दृश्यांमुळे खूप वादात सापडला होता. दरम्यान 23 कटनंतर चित्रपटाला CBFC कडून U/A प्रमाणपत्र मिळाले आहे. स्वतः सनी देओलने या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले आहे. सनी देओलचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरचा हा आजचा हा दुसरा दिवस आहे. त्याचा जाट चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे लोक खूप कौतुक होत आहे. तसेच, चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगला व्यवसाय केला आहे.

सनी देओलचा पहिला चित्रपट बेताब
67 वर्षीय सनी देओलने 1983 मध्ये "बेताब" या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. हा चित्रपट रोमँटिक होता ज्यामुळे सनी देओलचा मोठया प्रमाणात चाहतावर्ग तयार झाला. त्यानंतर सनीने पडद्यावर अशी अॅक्शन दाखवली की, ती पाहिल्यानंतर लोक त्याच्याबद्दल वेडे झाले. लोक त्याला बॉलिवूडचा "ही-मॅन" म्हणतात. सनी देओलचे खरे नाव अजय सिंह देओल आहे.
ढाई किलो का हाथ" सनी देओलचा फेमस डॉयलॉग
1993 मध्ये आलेल्या "दामिनी" चित्रपटातील "ढाई किलो का हाथ" हा हिट डॉयलॉग आज प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. याआधीही त्याचे चित्रपट हिट झाले होते पण या डॉयलॉगमुळे तो लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा आवडता बनला. या चित्रपटात सनी मुख्य भूमिकेत नसतानाही त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली आणि हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट ठरला.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता आहे सनी देओल
घायाळ (1990), दामिनी (1993), गदर: एक प्रेम कथा (2001), बॉर्डर (1997), गदर 2 (2023) हे त्यांचे मेगाहिट चित्रपट आहेत. लोक अजूनही हे चित्रपट टीव्हीवर वारंवार पाहतात. 2 वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता सनी देओल हा सुपरस्टार धर्मेंद्र यांचा मुलगा आहे, त्याने त्याच्या वडिलांकडून अभिनयाचे धडे घेतले आहेत.
सनी देओलची संपत्ती किती कोटी आहे?
सनी देओल हा एक लक्झरी लाइफ जगतो. www.caknowledge.net नुसार सनी देओलची एकूण संपत्ती सुमारे 130 कोटी रुपये आहे, तर तो एका चित्रपटासाठी 10-15 कोटी रुपये फिस घेतो.
'बॉर्डर 2' आणि 'रामायण' चित्रपटातही दिसणार सनी दिओल
सनी देओलचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस आहे. तसेच तो ब्रँड एंडोर्समेंटमधूनही भरपूर कमाई करतो. मुंबईजवळ त्याचा एक सुंदर बंगला आहे आणि त्याला महागड्या गाड्यांचाही शौक आहे. सनी देओल जो सहसा चित्रपटाच्या पार्ट्यांपासून दूर राहतो. तो एक हेल्दी आयुष्य जगतो आणि त्याच्या फिटनेससाठी देखील ओळखलं जातं. 'जाट' चित्रपटानंतर तो 'बॉर्डर 2' आणि 'रामायण' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे.
-
आजचे राशीभविष्य: सोमवार १६ मार्च २०२६, 'या' राशींना होणार प्रचंड धनलाभ; पाहा तुमची रास! -
LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! गॅस सप्लाय बंद होण्याची भीती वाटतेय? घरबसल्या करा e-KYC 'ही' सोपी पद्धत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Rajya Sabha Election 2026 Result : राज्यसभेच्या 37 जागांचा निकाल; पाहा विजेत्यांची यादी -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Gold silver price today : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा ताजे दर -
Oscars 2026 Winners : ऑस्कर पुरस्कारांची घोषणा हा चित्रपट ठरला सर्वात भारी; पाहा संपूर्ण विनर लिस्ट -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा









Click it and Unblock the Notifications