पतीसोबत हॉटेलच्या खोलीत एकत्र राहण्यास श्रीदेवीने दिला होता नकार! तिने का घेतला होता हा निर्णय? वाचा
Sridevi had refused to stay in a hotel room with her husband : श्रीदेवी म्हणजे टाॅलीवूड आणि बाॅलीवूडला पडलेले सोनेरी स्वप्न..एक चांदणी जी रुपेरी दुनियेत स्वःत प्रकाशमान होते आणि तिच्या कलेच्या आणि सौंदर्याच्या तेजाने सर्व चंदेरी दुनियेत झगमगाट व्हावा अशी ही गुणी अभिनेत्री अचानक सोडून गेली. तिच्या एक्झिटमुळे रसिकांना तर मोठा धक्काच बसला.

जशी ही तारका बाॅलीवूडमध्ये प्रकाशमान झाली तशीच ती साऱ्या भारतात आणि जगात आपल्या अदाकारीने कलेने प्रसिद्ध झाली. हिंदी चित्रपटसृष्टीतील 'चांदणी' श्रीदेवी यांचे अकाली निधन हे चाहत्यांसाठी आणि कुटुंबासाठी एक धक्का होता. त्यांच्या जाण्यानंतरही त्यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी आजही समोर येत असतात. फिल्मी बीटच्या वृत्तानुसार, नुकतीच एक गोष्ट उघडकीस आली आहे, जी त्यांच्या निधनाच्या आठ महिने आधी घडली होती. श्रीदेवीने त्यावेळी पती बोनी कपूरसोबत एकाच हॉटेलच्या खोलीत राहण्यास नकार दिला होता आणि स्वतःसाठी वेगळी खोली घेतली होती. पण तिने असे का केले होते?
'या' गोष्टीमुळे घेतला निर्णय
पती बोनी कपूरसोबत एकाच हॉटेलच्या खोलीत राहण्यास नकार दिला, तेव्हा यामागे कोणतेही वैयक्तिक कारण नव्हते, तर श्रीदेवीच्या कामाप्रती असलेले अविश्वसनीय समर्पण हेच मुख्य कारण होते. त्यावेळी त्या तिच्या अखेरच्या 'मॉम' (Mom) चित्रपटाचे शूटिंग ती करत होती. या भूमिकेमध्ये पूर्णपणे समरस होण्यासाठी आणि केवळ आपल्या पात्राचाच विचार मनात यावा, यासाठी तिने बोनी कपूरसोबत राहण्याऐवजी वेगळी खोली पसंत केली होती. त्यांना 'मॉम'च्या भूमिकेशिवाय अन्य कोणताही विचार मनात येऊ द्यायचा नव्हता.
रहस्य उलगडले, चाहते थक्क
श्रीदेवींच्या मृत्यूनंतर इतक्या वर्षांनी हे रहस्य उलगडले असून, त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आश्चर्य वाटले आहे. श्रीदेवी ही प्रसिद्ध अभिनेत्री तिच्या कामाबद्दल किती प्रामाणिक होती, हे यातून दिसून येते. एकेकाळी त्या बॉलिवूडच्या सर्वाधिक मानधन घेणारी ती अभिनेत्री होती आणि काही चित्रपटांमध्ये त्यांनी नायकांपेक्षाही जास्त फी घेतली होती.
श्रीदेवीची होती 'ही' इच्छा!
श्रीदेवींच्या अचानक जाण्याने केवळ लोकांनाच नाही, तर त्यांची मुलगी जान्हवी कपूरला सर्वाधिक धक्का बसला होता. त्यावेळी जान्हवी तिच्या 'धडक' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. आपल्या पहिल्या चित्रपटाच्या प्रीमियरला आईने उपस्थित राहावे, हे तिचे स्वप्न होते. मात्र, ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. 'धडक'च्या यशाचे श्रेय जान्हवीने तिच्या दिवंगत आईला दिले, कारण जान्हवीने हा चित्रपट करावा आणि यातून पदार्पण करावे, अशी श्रीदेवींची इच्छा होती.












Click it and Unblock the Notifications