Mayank Pawar Death: 'स्प्लिट्सविला 7' फेम मयंक पवार यांचे निधन; सनी लिओनीही ढसाढसा रडली! कारण काय?
Splitsvilla 7 fame mayank pawar passes away : फिटनेस आणि ग्लॅमर विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. टीव्ही रिॲलिटी शो 'स्प्लिट्सविला ७' (Splitsvilla 7) मधील लोकप्रिय स्पर्धक आणि प्रसिद्ध फिटनेस आयकॉन मयंक पवार यांचे वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे फिटनेस कम्युनिटी आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली असून, एका तरुण प्रतिभेच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

२३ फेब्रुवारीला घेतला अखेरचा श्वास
मयंक पवार यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २३ फेब्रुवारी रोजी मयंकने जगाचा निरोप घेतला. आज, २५ फेब्रुवारी रोजी त्यांच्यासाठी प्रार्थना सभेचे (Prayer Meeting) आयोजन करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
फिटनेस विश्वातील 'चॅम्पियन'
मयंक पवार केवळ टीव्ही कलाकार नव्हता, तर फिटनेस इंडस्ट्रीतील एक मोठे नाव होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल ७ वेळा 'मिस्टर इंडिया' हा किताब जिंकला होता. त्यांच्या शिस्तबद्ध आयुष्यामुळे आणि शरीरसौष्ठवामुळे अनेक तरुण त्यांना आपला आदर्श मानत असत.
जेव्हा सनी लिओनीला अश्रू अनावर झाले...
'स्प्लिट्सविला ७' च्या दरम्यान मयंक पवार हा सर्वात चर्चेतील स्पर्धक होता. जेव्हा मयंक शोमधून बाहेर (Eliminate) झाला होता, तेव्हा शोची होस्ट आणि अभिनेत्री सनी लिओनी हिला आपले अश्रू रोखता आले नव्हते. सनीने त्याला मिठी मारून रडत निरोप दिला होता. केवळ सनीच नाही, तर शोचा दुसरा होस्ट निखिल चिनप्पा यानेही मयंकच्या जाण्याने दुःख व्यक्त केले होते. मयंकचा स्वभाव आणि खेळातील जिद्द यामुळे तो सर्वांचा आवडता बनला होता.
काय आहे मयंक पवार आणि सनी लिओनी यांचे नाते?
- मुळातः मयांक पवार आणि सनी लिओनी यांच्यात कोणतेही वैयक्तिक नाते नव्हते, तर त्यांच्यातील नाते हे सूत्रसंचालक आणि स्पर्धक असे व्यावसायिक आणि आदराचे होते.
- स्प्लिट्सविला ७: सनी लिओनी रिअॅलिटी शो 'स्प्लिट्सविला ७' ची होस्ट होती, तर मयंक पवार त्या शोमधील एक लोकप्रिय स्पर्धक होता.
- शो दरम्यान मयंकचा स्वभाव, त्याची खेळातील जिद्द आणि प्रामाणिकपणा यामुळे सनी लिओनी त्याच्याशी भावनिकरीत्या जोडली गेली होती.
- जेव्हा मयंकला शोमधून बाहेर पडावे लागले (Eliminate), तेव्हा सनी लिओनीला प्रचंड दुःख झाले होते. ती कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडली होती आणि तिने त्याला मिठी मारून निरोप दिला होता.
- आदर: सनी नेहमीच मयंकच्या फिटनेसबद्दल आणि त्याच्या शिस्तबद्ध वागण्याबद्दल त्याचे कौतुक करायची. एका स्पर्धकाच्या जाण्याने शोच्या होस्टच्या डोळ्यात पाणी येणे, ही गोष्ट मयंकच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव दर्शवणारी होती.












Click it and Unblock the Notifications