Sonu Nigam Net Worth : कोट्यवधी रुपयांचा मालक आहे सोनू निगम! जाणून घ्या त्याचा कन्नड वाद काय?
Sonu nigam net worth And car collection : अलिकडे कन्नड गाण्यामुळे वादात सापडलेला भारतातील आघाडीचा प्रसिद्ध गायक सोनू निगम हा सध्या जास्तच चर्चेत आहे. गाणे गाण्यास नकार दिल्यानंतर या गायकाने या त्यावर प्रतिक्रीया अशी दिली की, त्यामुळे गदारोळ माजलेला आहे. अशातच त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. यानंतर त्याने आता न्यायालयात दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी धाव घेतली आहे.
बहुदा अनेक दिग्गज नेते असो की, कलाकार आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत येतात. महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनोदी आणि तितकाच संवेदनशील कवी, कलाकार कुमार कामराने कविता केली होती, यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आणि मुंबईत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मोठी राळही उठवली होती. हे प्रकरण महाराष्ट्रात तूर्त शांत झाले आहे तर दुसरीकडे कर्नाटकमध्ये सोनू निगमशी संबंधित प्रकरणामुळे वाद झाला आहे.

काय आहे सोनू निगमचा कन्नड वाद?
अलिकडेच बंगळुरूमधील एका महाविद्यालयात झालेल्या संगीत मैफिलीत काही प्रेक्षक सोनू निगमकडून कन्नड गाण्यांची वारंवार मागणी करत होते. त्यावर या गायकाने तीव्र प्रतिक्रिया दिली. सोनू निगम म्हणाला की 'त्याला धमकावण्याचा प्रयत्न करणारे फक्त चार ते पाच लोकं होती. दरम्यान सोनू निगमने या घटनेचा संबंध 'पहलगाम दहशतवादी हल्ल्या'शी जोडल्यानंतर हा मुद्दा तापला. ज्यावर अनेक कन्नड संघटनांनी त्याच्यावर संताप व्यक्त केला आणि सोनू निगमविरुद्ध खटला दाखल केला, आता गायकाने त्याच्या तक्रारीविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले आहे. सध्या उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 15 मे पर्यंत तहकूब केली आहे.
सोनू निगमची संपत्ती किती आहे?
- सोनू निगम देशातील आघाडीचा गायक आहे साहाजिकच त्याचे मानधनही तेवढ्याच ताकदीचे आहे. त्याच्या कलेच्या जोरावर त्याने अमाप संपत्ती मिळवली आहे. तो कोट्यवधीचा मालक आहे, तो एक उच्च जीवनपद्धतीचा पुरस्कर्ता आहे.
- dnaindia.com नुसार, सोनू निगमची एकूण संपत्ती सुमारे 350 कोटी रुपये आहे.
- सोनू निगम त्याच्या एका गाण्यासाठी 18-20 लाख रुपये घेतो.
- सोनू निगमची अंदाजे कमाई दरवर्षी सुमारे 26 कोटी रुपये आहे.
- सोनू निगमकडे कारचे चांगले कलेक्शन आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर व्होग, मर्सिडीज-बेंझ ई-क्लास, ऑडी सारख्या महागड्या गाड्या आहेत.
- सोनू निगमडी दुबई-मुंबईतही आलिशान घरे आहेत.
- गाण्यांव्यतिरिक्त, सोनू रिएलीटी शो आणि जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतो.
सोनू निगमने किती गाणे गायले?
सोनू निगमच्या आतापर्यंतचा प्रवास पाहता सोनू निगमने 32 हून अधिक भाषांमध्ये 6000 हून अधिक गाणी गायली आहेत.हिंदी व्यतिरिक्त सुमारे 32 भाषांमध्ये गाणी गाणाऱ्या सोनू निगमची सोशल मीडियावरही मोठे चाहते आहे. आपल्या गायनातून लोकांना प्रेम शिकवणाऱ्या सोनू निगमने कन्नड, मराठी, तमिळ, तेलगू, बंगाली, उर्दू, इंग्रजीसह 32 हून अधिक भाषांमध्ये 6000 हून अधिक गाणी गायली आहेत.
हरियानात जन्म, दुसरा मोहम्मद रफी ही ओळख
- 30 जुलै 1973 रोजी हरियाणातील फरिदाबाद येथे सोनू निगमचा जन्म झाला.
- सोनू निगमने उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेले आहे.
- सोनू निगमने 1990 च्या दशकात बॉलिवूडमध्ये पार्श्वगायक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
- सोनू निगमचे पहिले हिट गाणे "अच्छा सिला दिया" हे होते. यामुळे सोनू निगम रातोरात स्टार बनले.
- 'संदेसे आते हैं', 'कल हो ना हो', 'सूर्यवंशी मधम' आणि 'अभी मुझे कुछ' या गाण्यांनी त्यांना संगीतविश्वाचा राजा बनला.
- सोनू निगमला लोक दुसरे 'मोहम्मद रफी' म्हणतात.
डिस्क्लेमर : ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या श्रद्धा आणि माहितीवर आधारित आहे. वनइंडिया लेखाशी संबंधित कोणत्याही इनपुट किंवा माहितीची पुष्टी करत नाही.












Click it and Unblock the Notifications