Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सोनमने दिला पतीला धोका! कंगना राणावतने सांगितलं तिला नवरा कसा हवा? 6 उत्तर देऊन सारं केलं स्पष्ट

Sonam raja raghuvanshi case Kangana Ranaut's angry reaction : इंदुरच्या राजा रघुवंशी हत्या कांडाची चर्चा देशभर आहे, पत्नी सोनम रघुवंशीने त्याच्याशी नुकतेच लग्न केले होते आणि त्यानंतर दोघे हनीमूनलाही गेले होते, एकीकडे हनीमुनचे गोड दिवस साजरे करतानाच राजा रघुवंशीची हत्या झाली. तपास सुरु झाला तेव्हा पत्नीच मारेकरी निघाली. सोनमच्या अंगावरची हळदही निघाली नसताना तिने आपल्या पती परमेश्वरासोबत असे कृत्य केले.

sonam raja raghuvanshi case Kangana Ranaut s angry reaction

इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांडानंतर काही दिवस सोनम बेपत्ता राहिली. यानंतर, सोनमला यूपीतील गाजीपूर येथून अटक करण्यात आली. हे सर्व इतके धक्कादायक होते की संपूर्ण देश, विशेषतः मुलाचे कुटुंब विचारात आहे... या भयानक घटनेला लग्नाआधीचे सोनमचे अफेअर कारणीभूत ठरले आहे. या अफेअरमुळेच राजाची हत्या झाली.

सोनमच्या कृत्यावर काय म्हणाली कंगना राणावत?

बॉलिवूड अभिनेत्री आणि आता राजकारणात सक्रिय कंगना राणौतनेही या प्रकरणावर आपले मत मांडले आहे. तिने याला 'क्रूर, घृणास्पद म्हटले आहे. कंगनाने तिच्या इंस्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे की, "मुलगी तिच्या पालकांच्या भीतीमुळे लग्नाला नकार देऊ शकत नाही, परंतु खून करण्याची योजना आखते?"

कंगना आरोपी सोनम रघुवंशीवर रागावली आणि वक्तव्य केले, यानंतर दरम्यान, कंगनाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ती तिच्या 'ड्रीम मॅन'बद्दल उघडपणे बोलत आहे. हा व्हिडिओ कपिल शर्मा शोमधील आहे, जिथे तिला मजेदार प्रश्न विचारण्यात आले होते आणि तिने हजरजबाबीपणे उत्तरेही दिली.

कसा हवा कंगनाला नवरा..?

1. प्रश्न - तुम्हाला शांत मुलगा आवडतो की बोलका
कंगनाचे उत्तर: शांत, कारण मला बोलायला आवडते.

2. प्रश्न - जिम की योगा?
कंगनाचे उत्तर : योगा, कारण मन देखील शांत राहिले पाहिजे.

3. प्रश्न - नवरा कंजूष हवा की खर्चिक?

कंगनाचे उत्तर : कंजूष, कारण मी खर्च करतेच

4. प्रश्न - बेरोजगार चालेल की काम करणारा नवरा?

कंगनाचे उत्तर - अजिबात नाही, कमावणारा हवा.

5. प्रश्न - फॅमिली टाईप मुले आवडतात, पार्टी करणारे
कंगनाचे उत्तर - फॅमिली टाईपच

6. प्रश्न - नवरा कुठल्या क्षेत्रातील हवा, चित्रपटांमधून किंवा राजकारणातून?

कंगनाचे उत्तर - कुठल्याही क्षेत्रातील चालेल, बस्स दिल से होना चाहीए अशा अंदाजात हिंदीतून तिनं उत्तर दिलं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+