"मी अस्सल महाराष्ट्रीय म्हणायला कचरते..!" मराठी गौरव दिनी सोनाली बेंद्रे असं का म्हणाली? घ्या जाणून
Sonali Bendre on Marathi Language : सोनाली बेंद्रे सिनेसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न..तिचा अभिनय तर भारीच आहे पण यासोबतच तिच्या सौंदर्याची चर्चा होणार नाही असे कधीच झाले नसेल..मराठीबाणा जपणारी सोनाली बेंद्रेंने मराठी गौरव दिनी 27 फेब्रुवारी 2025 रोजी एका कार्यक्रमात कविता सादर केली.
मराठी गौरव दिनाच्या कार्यक्रमात विंदा करंदीकर यांची देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे ही लोकप्रिय आणि महाराष्ट्राला वेड लावणारी कविता म्हटली, पण तिने जे वक्तव्य केले त्याची आता जास्त चर्चा होत आहे. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, दिग्गज गीतकार जावेद अख्तर, दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर, छावा फेम प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल, दिग्गज दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर,स्टार कलाकार रितेश देशमुख आदींची उपस्थिती होती.

काय म्हणाली सोनाली बेंद्रे..?
सोनाली बेंद्रे म्हणाली, मी आज महाराष्ट्रातील दिग्गज व्यक्तींसमोर उभी आहे. आज एक गोष्ट मी कबूल करते,
मी स्वःतला अस्सल महाराष्ट्रीय म्हणायला थोडीशी संकोचते. कारण माझा जरी जन्म जरी बेंद्रेची सोनाली म्हणून झाला असेल तरीही माझे वडील कायम महाराष्ट्राबाहेर पोस्टींगला होते, त्यामुळे माझे संपूर्ण बालपण महाराष्ट्राबाहेर गेले आहे.
घरात मराठीच बोललं जातं..
सोनाली बेंद्रे म्हणाली, इतक्यावेळा आमची घरं बदलली की, घरचा पत्ता लिहिण्याआधीच आम्ही पुढच्या शिफ्टींगचा विचार करायचो. तरीही एका गोष्टीत कोणतीही तडजोड आमची नव्हती ती म्हणजे आमच्या घरातील मराठीपणा..कुठेही राहीलो , कितीही भाषा शिकल्या, वेगवेगळ्या भाषांतील मित्र-मैत्रिणी भेटल्या तरीही आमच्या घरात मराठीच बोलले जायचे.
केवळ कविताच नाही वाचली तर सोनाली बेंद्रेने या कवितेचा काहीसा मतितार्थ सांगत शब्दालाही साज चढवला. सोनालीने वाचलेल्या कवितेने उपस्थितांनी मोठी दाद दिली. सोनाली बेंद्रेंनी वाचलेली विंदा करंदीकर यांची लोकप्रिय कविता येथे देत आहोत.
"देणार्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी
वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नासाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्या भिमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी
देणार्याने देत जावे
घेणार्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्याचे हात घ्यावे."












Click it and Unblock the Notifications