'व्हर्जिन मुली भेटणं कठीण' युजर्सच्या कमेंटवर या गायिकेने सुनावलं! म्हणाली -"पुरुषांनीच लग्नाआधी.."
लाखोंच्या संख्येने झालेल्या कंडोम विक्रीवर एका युजर्सने नाराजी व्यक्त करत हल्ली व्हर्जिन मुली भेटणं कठीण आहे असे म्हटले होते त्यावर प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदा हिने युजर्सला थेट उत्तर देत सुनावले. ही प्रसिद्ध गायिका तिच्या नीडर स्वभावासाठी ओळखली जाते. गुरुवारी एका युजर्सने यासंदर्भात पोस्ट टाकली होती, त्यावर तिने उत्तर देत ठणकावले.

नवीन वर्षाच्या पार्टीसाठी 31 डिसेंबरच्या रात्री देशभरात नवीन वर्षाचा जल्लोष मोठ्या थाटामाटात साजरा केला. या खास प्रसंगी, भारतात रेकॉर्डब्रेक ऑनलाइन शॉपिंग झाली. स्पीड-डिलिव्हरी स्टार्टअप्सनी सोशल मीडियावर युजर्सच्या मजेशीर ऑर्डर पोस्ट केल्या. युजर्संनी त्यांची न्यू इयर पार्टी सेलिब्रेशन संस्मरणीय बनवले. या काळात द्राक्षे, चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, कंडोमपासून ते हँडकफ आणि पार्टी प्रॉप्सपर्यंत, नवीन वर्ष साजरे करण्याच्या तयारीत प्रत्येक गोष्टी ग्राहकांनी खरेदी केल्या.
हेही वाचा : मासिक पाळीत महिलांनी काय काळजी घ्यावी, चुकून 'या' गोष्टी केल्यातर जीवाला होईल धोका
31 डिसेंबर रोजी कंडोम विक्रीने नवे विक्रम प्रस्थापित केले. स्विगी इंस्टामार्टने दुपारपर्यंत 4,779 पॅकेट्स वितरित केल्या, तर ब्लिंकिटने रात्री 1.2 लाख पॅकेट वितरित केल्या गेल्या. यासंदर्भात एका युजर्सने सोशल मीडियावर पोस्ट केली आणि आली होती. हाच संदर्भ घेत एका युजर्सने 1.2 लाख पॅकेट कंडोमची पाकीटे विकली गेली हा फक्त काल रात्रीचा आकडा आहे आणि ब्लिंकिटवरचा आहे. इतर ई-काॅमर्स साईट्स आणि मार्केट्समध्ये कंडोमची दशलक्षांमध्ये विक्री झाली असेल ...असे म्हणत पिढीत लग्नासाठी व्हर्जिन मुलगी शोधणाऱ्यांना शुभेच्छा..असे लिहिले होते.
हेही वाचा : कंडोम, अंगुर, आलू भुजिया अन् बरंच काही थर्डी फस्टच्या रात्री लोकांनी काय काय ऑर्डर केलं? वाचा
या पोस्टवरुन या गायिकेने आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. टीव्ही-9 मराठीने यासंदर्भात वृत्त दिले त्यानुसार, या गायिकेने सोशल मीडियावर लिहिले की, मग..पुरुषांनी लग्नाच्या आधीच स्त्रियांसोबत सेक्स करु नये. जोपर्यंत पुरुष शेळ्या, कुत्रे आणि सरपटणारे प्राणी यांच्याशी संभोग करत नसतील. महिलांना व्हर्जिन या शब्दाचं वेड नाही. पुरुष हे तसेही लैंगिकदृष्ट्या सक्रिय असतात असं महिलांना वाटतं आणि तुम्हा सर्वांनी सुरक्षित किंवा असुरक्षित सेक्स केलंय का हे विचारण्याची हिंमतसुद्धा ते करत नाहीत. असो.. (काही ऑनलाइन कम्युनिटीचे असे सदस्य जे स्वतःला लैंगिकदृष्ट्या स्त्रियांना आकर्षित करण्यास सक्षम समजत नाहीत / विशेषतः लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या महिला आणि पुरुषांबद्दल प्रतिकूल असलेल्या विचारांशी संबंधित) बंधूंना असं वाटतं की त्यांनी एखाद्या महिलेशी सेक्स करून तिला कायमचं दूषित केलंय. त्यामुळे पुरुषांना असा काही आजार असलाच पाहिजे ज्यातून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणारी स्त्री कधीही बरी होऊ शकत नाही आणि ज्यापासून इतर पुरुष घाबरतील.'
या गायिकेने काही वेळानंतर तिची ही पोस्ट डिलिट केली आहे. मात्र त्याचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications