ऐश्वर्या रायशी नाही तर या अभिनेत्रीशी सलमान खानला करायचे होते लग्न, लग्नाची परवानगी मागितली, पण....
Salman Khan and Juhi Chawla: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांचा हा चित्रपट 30 मार्च 2025 रोजी ईदच्या खास प्रसंगी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
सलमान खानचे चाहते या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला जो लोकांना खूप आवडला आहे. 59 वर्षीय सलमान खान जेव्हा जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा लोक त्याच्याबद्दल वेडे होतात.

सलमान खान आणि त्याचे अफेअर्स
सलमान खान केवळ त्याच्या व्यावसायिक आयुष्यासाठीच नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. सलमान खानने आजपर्यंत लग्न केलेले नाही, परंतु त्याचे नाव अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींशी जोडले गेले आहे. सलमान खानचे अनेक अभिनेत्रींसोबत सीरीयस रिलेशनशिप राहिलं आहे.
सलमान खानचे नाव सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफशी जोडले गेले आहे. ऐश्वर्या राय सोबतच्या त्याच्या प्रेमकथेचा शेवट खूप वेदनादायक होता. पण तुम्हाला माहिती आहे का की एकेकाळी सलमान खान त्याची प्रेयसी ऐश्वर्या रायशी नाही तर त्याची क्रश जूही चावलाशी लग्न करू इच्छित होता.
सलमान खानला जुही चावलासोबत लग्न करायचे होते
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान देखील लग्नाचा प्रस्ताव घेऊन जुही चावलाच्या घरी गेला होता, परंतु अभिनेत्रीच्या वडिलांनी सलमान खानचा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला होता. त्यांनी या लग्नाला स्पष्ट नकार दिला होता. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जातो की , सलमान खानला एकेकाळी जुही चावलासोबत लग्न करायचे होते. सलमान खानने स्वतः मीडियाला हे सांगितले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खानने एका जुन्या मुलाखतीत म्हटले होते की, जुही चावलाच्या वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता. मात्र सलमानला यामागील कारण काय होते हे माहित नाही. सलमान खान म्हणाला होता की, त्यावेळी जूही चावला खूप गोड आणि सुंदर दिसत होती. मी तिच्या वडिलांना विचारले की, ते तिला माझ्याशी लग्न करण्याची परवानगी द्या, त्यावर त्यांनी स्पष्टपणे नकार दिला होता. कदाचित मी जुही चावलासाठी योग्य नव्हतो. मला वाटतं त्यांना माझ्याशी काहीतरी अडचण होती. त्यांना काय हवे होते ते मला माहित नाही.












Click it and Unblock the Notifications