Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सलमानच्या सिकंदरची पहिल्या दिवशी फक्त एवढीच कमाई, विकी कौशलच्या 'छावा'च्या जवळपास ही नाही

Sikandar Box Office Collection Day 1: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट या ईदला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच रश्मिका मंदान्ना त्याच्यासोबत दिसली. आता चित्रपटाचा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफिस कलेक्शनही समोर आला आहे.

सलमान खान शेवटचा 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. आता दीड वर्षानंतर सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दरम्यान पहिल्या दिवशी सलमानचा सिंकदर चित्रपट 'छावा' चित्रपटाला तो तितका टक्कर देऊ शकला नाही.

Sikandar

सॅकॅनिल्कच्या रिपोर्टनुसार सिकंदरने पहिल्या दिवशी 26 कोटींची कमाई केली आहे. या ओपनिंग कलेक्शनला कोणताही विशेष रेकॉर्ड करता आला नाही. जर आपण त्याची तुलना विकी कौशलच्या "छावा" चित्रपटाशी केली तर तो कमाईच्या बाबतीत मागे पडला. छावा या चित्रपटाने पहिल्या दिवशी 31 कोटी रुपये कमावले होते.

सलमानच्या यापुर्वीच्या चित्रपटांनी यापेक्षा चांगली कमाई केली आहे. 2016 रोजी प्रदर्शित झालेला सुलतान चित्रपटाने पहिल्या दिवशी 36.54 कोटी रुपये कमावले होते. तर टायगर 3 या चित्रपटाने 53.3 कोटी रुपयांची शानदार सुरुवात झाली. आता येत्या काळात चित्रपट किती वेगाने कमाई करतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Take a Poll

'सिकंदर' चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनवरून हे सांगणे कठीण आहे की हा 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल की नाही. ईद असल्याने दुसऱ्या दिवशी चित्रपट चांगला व्यवसाय करेल, अशी निर्मात्यांना आशा आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना , काजल अग्रवाल, शर्मन जोशी, सुनील शेट्टी आणि प्रतीक स्मिता पाटील यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+