Shyam Benegal :8 वेळा नॅशनल अवार्ड जिंकला! सिनेसृष्टीला दिले सर्वोत्कृष्ट कलाकार, वाचा त्यांची कहाणी
Shyam Benegal : श्याम बेनेगल:बाॅलीवूडला एकापेक्षा एक सरस सिनेमे देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे काल 23 डिसेंबरला निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी सोमवारी सायंकाळी उशिरा बॉलीवूडसह संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरणारी ठरली. बेनेगल दीर्घकाळापासून वयोमानानुसार आरोग्याच्या समस्यांना तोंड देत होते. आपल्या कलेतून जगप्रसिद्ध झालेले बेनेगल आता आपल्यात नसले तरी आपल्या चित्रपट कलेतून ते कलाप्रेमी आणि जगभरातील त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात सदैव जिवंत राहतील.

14 डिसेंबर रोजी 90 वा वाढदिवस साजरा
श्याम बेनेगल यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत चित्रपटसृष्टीला उत्कृष्ट चित्रपट दिले. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते श्याम बेनेगल यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. शहरातील वोक्हार्ट रुग्णालयात सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बेनेगल दीर्घकाळापासून किडनी आणि वयाशी संबंधित आजारांनी त्रस्त होते. याच महिन्यात म्हणजेच 14 डिसेंबर रोजी त्यांनी त्यांचा 90 वा वाढदिवस साजरा केला.
Zakir Hussain : तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन, वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पद्मभूषण आणि पद्मश्रीने सन्मानित
मनोरंजन विश्वातील योगदानाबद्दल बेनेगल यांना भारतातील सर्वोच्च पुरस्कार पद्मभूषण आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. चला जाणून घेऊया श्याम बेनेगल यांचे फिल्मी करिअर आणि वैयक्तिक आयुष्य कसे होते?
श्याम सुंदर बेनेगल यांचा जन्म 14 डिसेंबर 1934 रोजी हैदराबादच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. ते प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट निर्माते गुरु दत्त यांचे चुलत भाऊ आहेत. श्यामच्या वडिलांना स्टिल फोटोग्राफीची आवड होती. बेनेगल यांनी अर्थशास्त्रात M.A. पदवी घेतली, त्यानंतर त्याने फोटोग्राफी करायला सुरुवात केली. 'अंकुर' हा पहिला चित्रपट बनवण्यापूर्वी त्याने ॲड एजन्सीसाठी अनेक ॲड फिल्म्स बनवल्या होत्या. चित्रपट आणि जाहिराती बनवण्यापूर्वी श्याम कॉपी रायटर म्हणून काम करायचे.
चित्रपटसृष्टीतील चालतं बोलतं विद्यापीठ थांबले; फिल्म निर्माते श्याम बेनेगल यांचे निधन, वाचा कारकिर्द
चित्रपटसृष्टीतील कारकीर्द
चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अनेक दशकांच्या सेवेदरम्यान, बेनेगल यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक महान अभिनेते दिले. त्यांच्या काळात अभिनय करणाऱ्या इंडस्ट्रीतील कलाकारांमध्ये नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, अमरीश पुरी, अनंत नाग, शबाना आझमी, स्मिता पाटील आणि सिनेमॅटोग्राफर गोविंद निहलानी यांचा समावेश आहे, या सर्वांनी बेनेगल यांच्या दिग्दर्शनाखाली आपली कारकीर्द सुरू केली.
'भारत एक खोज'चे दिग्दर्शिन
बॉलीवूड चित्रपटांपूर्वी त्यांनी जवाहरलाल नेहरू आणि सत्यजित रे यांच्यावरील माहितीपट, दूरदर्शन मालिका 'यात्रा', 'कथा सागर' आणि 'भारत एक खोज' दिग्दर्शित केले होते. श्याम बेनेगल यांच्याकडे 8 चित्रपटांसाठी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांनी 24 चित्रपट, 45 माहितीपट आणि 15 जाहिरात चित्रपट केले. ज्यामध्ये जुबैदा, सुभाष चंद्र बोस: द फॉरगॉटन हीरो, नेताजी मंडी, द मेकिंग ऑफ द महात्मा, वेलकम टू सज्जनपूर, आरोहण यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.












Click it and Unblock the Notifications