कुछ तो गडबड है दया ! CID मध्ये ACP प्रद्युम्नचा मृत्यू होणार, काय आहे कारण घ्या जाणून
CID ACP Pradyuman: प्रसिद्ध टीव्ही शो 'सीआयडी' बद्दल एक मोठी गोष्ट समोर येत आहे. या शोबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. शोमधील मुख्य पात्र एसीपी प्रद्युम्नचा मृत्यू होणार असल्याची बातमी आहे.
'सीआयडी'मध्ये एसीपी प्रद्युम्नचा मृत्यू
अभिनेता शिवाजी साटम गेल्या अनेक वर्षांपासून 'सीआयडी' या प्रसिद्ध शोमध्ये एसीपी प्रद्युम्नची भूमिका साकारत आहेत. अभिनेत्याच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी एपिसोडमध्ये एसीपी प्रद्युम्नचे पात्राचा मृत्यू होणार आहे.

बॉम्बस्फोटात एसीपीचा मृत्यू होईल
बॉम्बस्फोट अपघात झाल्यावर एसीपी प्रद्युम्नचे पात्राचा मृत्यू होताना दाखवला जाईल. इंडिया टुडे डिजिटलमधील वृत्तानुसार सीआयडी शोच्या आगामी भागात बारबुसा (तिगमांशू धुलिया) सीआयडी टीमला संपवण्यासाठी बॉम्ब ठेवण्यात येईल.
नवीन भागात एक धक्कादायक खुलासा होईल
शोच्या नवीन भागात असे दाखवले जाईल की इतर सदस्य वाचतील तर एसीपी प्रद्युम्न आपला प्राण गमावतील. तिग्मांशू धुलिया अलीकडेच 6 वर्षांहून अधिक काळानंतर सीआयडीमध्ये परतला आहे आणि तो या शोमध्ये 'आय गँग'च्या कुप्रसिद्ध बारबोसाची भूमिका साकारत आहे.
चाहत्यांसाठी मोठा धक्का
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीआयडी टीमने नुकतेच या एपिसोडचे शूटिंग पूर्ण केले आहे, जो काही दिवसांत प्रसारित होणार आहे. दरम्यान या प्रकरणात फारशी माहिती समोर आलेली नाही. असे म्हटले जात आहे की, शोच्या निर्मात्यांना चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्का असावा असे वाटते. शोचा टीआरपी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
या मालिकेत यापूर्वीही अनेक पात्रांचा मृत्यू
सीआयडी शोच्या सुरुवातीच्या टप्प्यातही अनेक पात्राचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. दरम्यान काही काळानंतर काही पात्रे पुन्हा जिवंत झाली. सूत्रांचे म्हणणे आहे की, सध्या एसीपी प्रद्युम्नला परत आणण्याची कोणतीही योजना नाही, परंतु या ट्विस्टनंतर मिळालेल्या प्रतिक्रियेनुसार मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.'
सीआयडी' हा लोकप्रिय शो कुठे पाहायचा?
या वर्षाच्या सुरुवातीला सोनी टीव्हीवर 'सीआयडी' हा प्रसिद्ध शो पुन्हा सुरू करण्यात आला. सध्या हा शो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रसारित होत आहे.












Click it and Unblock the Notifications