50 लाख रुपये दे अन्यथा जीवे मारुन टाकू, बॉलिवूडच्या किंग खानला जीवे मारण्याची धमकी
Shah Rukh Khan Death Threat: बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आली आहे. रायपूरमधील एका व्यक्तीने फोन करून किंग खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आरोपीने धमकीचा फोन करून 50 लाखांची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत सलमान खाननंतर आता शाहरुख खानची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने मुंबईतील वांद्रे पोलिस स्टेशनच्या लँडलाइनवर कॉल केला होता. फोन करणाऱ्याने म्हटलं की, शाहरुख खान मन्नत हा बँड स्टँडचा मालक आहे, जर त्याने मला 50 लाख रुपये दिले नाहीत तर मी त्याला मारून टाकीन. त्यावर पोलिसांनी विचारले की तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात? त्यावर कॉलर म्हणाला- माझे नाव हिंदुस्थानी लिहा.

रायपूरमधील एका व्यक्तीने किंग खानला फोन करून धमकी दिल्याचे वृत्त आहे. फैजान खान असे या व्यक्तीचे नाव आहे. शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फैजान खानविरुद्ध मुंबईच्या वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीसाचं एक पथक रायपूरकडे रवाना झाल्याची माहिती आहे.
दरम्यान सलमान खानच्या घरावर काही दिवसांपुर्वी गोळीबार झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. सलमान खानला मिळणाऱ्या या धमक्यांमुळे केवळ त्याच्या कुटुंबातील सदस्यच चिंतेत नाहीत तर चाहत्यांची चिंताही वाढली आहे. त्यानंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी मिळल्याने शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती आहे.












Click it and Unblock the Notifications