रसिकांच्या हृदयावर राज करणारा शाहरुख खान झाला 59 वर्षांचा! वाचा किंग खानच्या जीवनातील खास गोष्टी
Shah Rukh Khan Turns 59 Know Biography Film Career Movie : एक स्ट्रगलर ते बाॅलिवूडचा सुपरस्टार आणि लाखो रसिकांची धडकन म्हणजे शाहरुख खान..सुरुवातीचा खडतर काळ सोसून मोठा झालेला अभिनेता होय. 14 फिल्मफेअर पुरस्कारांसह भारत सरकारचा पद्मश्री पुरस्काराने तर फ्रान्स सरकारकडून त्याला ऑर्डे डेस आर्ट्स एट डेस लेट्रेस आणि लीजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले आहे.
2 नोव्हेंबर 1962 ला जन्मलेल्या या सुपरस्टारचे आशिया आणि भारतीय उपखंडासह जगभरात लक्षणीय चाहते आहेत. जगातील सर्वात यशस्वी चित्रपट ताऱ्यांपैकी एक म्हणून त्याचा गौरव केला जातो. आपल्या चित्रपटाने 45 वर्षांपासून प्रेक्षकांवर गारुड या अभिनेत्याने घातले आहे. हा अभिनेता आता 59 वर्षांचा आज झाला आज त्याचा बर्थ डे... याचाच घेतलेला हा आढावा.

शाहरुखचं 45 वर्षांपासून प्रेक्षकांवर गारुड
- शाहरुख खानने 1980 च्या दशकात दूरदर्शन मालिकांमधून अभिनयाला सुरुवात केली. त्याने दिवाना या 1992 मध्ये आलेल्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
- सुरुवातीला बाजीगर (1993) आणि डर (1993) या चित्रपटांमध्ये त्याची खलनायकी भूमिका चांगलीच गाजली. दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे (1995), दिल तो पागल है (1997), कुछ कुछ होता है (1998), मोहब्बतें (2000), कभी खुशी कभी गम (2001) आदी चित्रपटांतून तो रोमँटिक भुमिकेत प्रेक्षकांना भावला.
- देवदास(2002) मधील मद्यपी, स्वदेस (2004) मधील नासा शास्त्रज्ञ, चक दे इंडिया (2007) मधील हॉकी प्रशिक्षक आणि माय नेम इज खान (2010) मधील एस्पर्जर सिंड्रोम असलेला एक माणूस, या त्याच्या भूमिकांना समीक्षकांची वाहवा मिळाली.
- शाहरुखने चेन्नई एक्स्प्रेस (2013), हॅपी न्यू इयर (2014) या विनोदी चित्रपटांतूनही आपल्यातलं टॅलेंट दाखवलं.

अशी क्षेत्रं ज्यात शाहरुखने कमावलं नाव
- कोलकाता नाइट रायडर्स आणि त्रिनबागो नाइट रायडर्सचा तो मालक आहे. हे सर्वश्रृतच आहे.
- शाहरुखने 2015 मध्ये रेड चिलीज एंटरटेनमेंटमधून चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर त्याने क्रिकेट क्षेत्रातही पाऊल ठेवले.
- अनेकदा तो दूरदर्शन प्रस्तुतकर्ता आणि रंगमंच सादरकर्ता म्हणूनही दिसतो.
- शाहरुख खानने आरोग्य सेवा आणि आपत्ती निवारण उपक्रमांमध्ये परोपकारी कामे केली आहेत.
- मुलांच्या शिक्षणाच्या समर्थनासाठी त्याला 2011 मध्ये युनेस्कोच्या पिरामाइड कॉन मार्नी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
- 2018 मध्ये त्याला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा क्रिस्टल पुरस्कारही मिळाला आहे.
- 2008 मध्ये न्यूजवीकच्या जगातील पन्नास सर्वात शक्तिशाली व्यक्तींमध्येही त्याचे नाव आले होते.
- 2023 मध्ये टाईम मासिकाने त्याचा उल्लेख जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये केला होता.

यंदा शाहरुख 59 वर्षांचा होत आहे
शाहरुखचं मात्र मुलांवर लक्ष!किंग खान अर्थात शाहरुख खानचा 2 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. यंदा शाहरुख 59 वर्षांचा होत आहे. यानिमित्त दिवाळी व शाहरुखचा बर्थडे या दोन्हींचा डबल धमाका शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर साजरा केला जाणार आहे. या दोन्हींसाठी मन्नत बंगल्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शाहरुखच्या कुटुंबासह त्यांच्या चाहत्यांमध्येही उत्साह पाहायला मिळत आहे.
मन्नतवर आकर्षक विद्युत रोषणाई
शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात विद्युत रोषणाई केलेल्या मन्नतची झलक पाहायला मिळत हे. त्यामुळं आता दिवाळीसोबत शाहरुखच्या बर्थडेसाठीही मन्नतवर खास तयारी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. शाहरुखच्या बर्थडे निमित्तानं त्याचे हजारो चाहते मन्नत बाहेर गर्दी करतात , शाहरुखही त्यांना नाराज करत नाही, तो घराच्या बाल्कनीत येत चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारतो. यंदाही शाहरुख मन्नतवरुन आपल्या चाहत्यांना खास भेट देणार असल्याचेही बोलले जातेय.

शाहरुख करणार मोठी घोषणा
या बर्थडे पार्टीत शाहरुख त्याच्या आगामी सिनेमाची ही घोषणा करू शकतो. शाहरुख आपल्या वाढदिवसानिमित्त खास चित्रपटाची घोषणा करणार असल्याचं काही मिडिया हाऊसने म्हटलं आहे. शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो बहुप्रतीक्षित 'किंग'या सिनेमात तो दिसणार आहे. 'किंग' या सिनेमाचं दिग्दर्शन सुजॉय घोष करत असून शाहरुख एका डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. या ॲक्शन थ्रिलर सिनेमात त्याची मुलगी सुहाना खानदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जातंय. या चित्रपटात अभिषेक बच्चन खलनायकाच्या भूमिकेत आहे.
किंग खान मुलांच्या भविष्यात व्यस्त
शाहरुखचा या वर्षी एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे त्याचे चाहते काहीसे नाराज होते. मात्र शाहरुखचा मुलगा आर्यन यंदा दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. त्याच्याकडे यावर्षी शाहरुखने लक्ष दिल्याचं सांगितलं जातं. शिवाय मुलगी सुहानाच्या आगामी चित्रपटावर शाहरुखचं लक्ष आहे. यापूर्वी २०२३ हे वर्ष शाहरुखसाठी खूप लकी ठरले होते. बॅक टू बॅक फ्लॉप दिल्यानंतर त्याने गेल्या वर्षी 'पठाण' आणि नंतर 'जवान' सारखे हिट चित्रपट दिले. आता यावर्षी तो मुलांच्या भविष्याकडे विशेष लक्ष देताना दिसला.












Click it and Unblock the Notifications