शाहरुख खानचा मेंटार ब्रदर एरिक डिसुझा यांचे निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास
मनोरंजन विश्वातून एक वाईट व वेदना देणारी बातमी समोर आली आहे. शाहरुख खानचा माजी मार्गदर्शक ब्रदर एरिक डिसूझा यांचे निधन झाले आहे. शाहरुख खान यांचे मार्गदर्शक म्हणून ब्रदर एरिक डिसूझा यांची एक ओळख होती. शाहरुखच्या जीवनात महत्त्वाचे बदल करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.
बॉलिवूड स्टार शाहरुख खानचे शालेय जीवनातील मेंटार आणि सेंट कोलंबा स्कूल दिल्लीतील प्रतिष्ठित शिक्षक ब्रदर एरिक स्टीव्हन डिसुझा यांचे निधन झाले आहे. ते दीर्घकाळ स्मृतीभ्रंश या आजाराने ग्रस्त असताना रविवारी दि.13 ऑक्टोर रोजी गोव्यात निधन झाले.

या आजाराने होते ग्रासलेले...!
स्मृतिभ्रंशामुळे त्यांची प्रकृती गंभीर बनली होती आणि त्यांना संवाद साधता येत नव्हता. सेंट कोलंबा शाळेतील विद्यार्थ्यांच्या, विशेषतः शाहरुख खानच्या जीवनात ब्रदर एरिक यांचे विशेष योगदान राहिलेले आहे. शाहरुखने त्यांना नेहमीच आपला मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत म्हणून कायम आठवणीत ठेवले.
पार्थिव शिलॉंगमध्ये पाठवले
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रदर एरिक डिझुझा यांच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव 15 ऑक्टोबर रोजी शिलाँगमधील सेंट एडमंड येथे नेले गेले. त्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.












Click it and Unblock the Notifications